अधिकार्यांना धरले धारेवर, कापुस उत्पादक शेतकर्यांना विनाकारण त्रास देऊ नका
परतूर । वार्ताहर
राज्याचे माजी पाणीपुरवठा मंञी तथा आ.बबनराव लोणीकर यांनी आचनकपणे परतूर येथील सीसीआय कापुस खरेदी केंद्राला भेट दिली व विनाकारण शेतकर्यांना त्रास देणार्या अधिकार्यांना चांगलेच खडसावले... कापसाची प्रतवारी ठरवत असतांना नियमाचे पालन करून प्रतवारी ठरवा परंतु विनाकारण शेतकर्यांना ञास होईल अशा प्रकारचा खोडसाळपणा करू नका असे तीव्रशब्दात ङ्गटकारले.मी हौसेने आपल्या खरेदी केंद्राला भेट देण्यासाठी आलो नसुन शेतकर्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्यामुळे आज मला येथे यावे लागले. कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवांना विचारणा करतांना नाङ्गेडच्या तुर, हरबरा, भरड धान्य खरेदीमध्ये दुजाभाव केल्याच्या तक्रारी आपणाकडे आल्या असुन शेतकर्यांसंदर्भात जात, धर्म, पक्ष, पंथ असला कुठलाही दुजाभाव आपण खपऊन घेणार नाही असे ते म्हणाले. नाङ्गेड खरेदी केंद्र चालवणार्या संस्थेचे सचिव श्री अनभुले यांच्या बाबतीत शेतकर्यांच्या अनेक तक्रारी असुन शेतकर्यांच्या तुर,हरभरा,मका खरेदीस प्रधान्य द्या असा सज्जड दम खरेदी संस्थेच्या सचिवाला यावेळी दिला.
कापुस खरेदीच्या बाबतीत ग्रेड पध्दतीचा अवलंब करून शेतकर्यांनी कापुसची खरेदी केल्यास शेतकर्यांना अडचणी येणार नाहीत. सद्य परिस्थिती मध्ये पेरणी चालु असतांना सुध्दा परतूर तालुक्यात जवळपास 1000 शेतकर्यांचा कापुस खरेदी करणे बाकी आहे. 32 हजार क्किंटल कापुस शेतकर्यांनकडे शिल्लक असुन येणार्या पंधरवाड्यात राहिलेला कापुस खरेदीचा वेग वाढवण्याच्याही सुचना यावेळी आमदार लोणीकर यांनी संबंधीतांना दिल्या.मंठा तालुक्यातील 40 हजार क्विटंल शेतकर्यांचा कापुस खरेदी करणे बाकी असुन तो तात्काळ खरेदी करण्याच्याही सुचना आपण संबंधीतास अधिकार्यास दिल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शेतकर्यांनी आ.लोणीकरांना समोर येणार्या असंख्य अडचणीच्या बाबतीत आपले गार्हाणे मांडले. यावेळी लोणीकरांनी आपण सर्वच जण शेतकरी कुटुंबात जन्मालो असुन शेतकरी हिताचे निर्णय घेऊन शेतकर्यांच्या कापुस खरेदीला प्राधान्य देतांना शेतकर्यांना अडचणी येणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सुचना यावेळी लोणीकरांनी दिल्या.
चक्क जिनिंगवर आ.लोणीकरांनी घेतली दोन तास बैठक
शेतकर्यांच्या अनेक तक्रारी अल्यामुळे आ.लोणीकरांनी शेतकर्यांची बाजु ऐकुण घेण्यासाठी चक्क जिनिंग प्रेसींगवर दोन तास बैठक घेतली.यावेळी शेतकरी सुर्यभान कदम यांनी आपली कापुस खरेदी बाबतची तक्रार आ.लोणीकरांकडे मांडतांना कापुस खरेदी बाबत अर्थिक देवाणघेवाण केल्यास तात्काळ कापसाची गाडी खरेदी केली जात असल्याचे सांगितले तर रामदास शेरे यांनी कापसाच्या कवडीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करीत असतांना सांगीतले की सायंकाळच्या वेळेस पैसे दिल्यास कापसाच्या गाडीचे मोजमाप ताबडतोप केले जाते.चिंचोली येथील शेतकरी सोपानराव कातारे म्हणाले की शेतकर्यांच्या पहिल्या वेचनीचा कापुस विक्रीसाठी आनत असुन जाणुन बुजुन कवडी ङ्गरदडीचे कारण दाखवत अनेक शेतकर्यांना ञास दिला जात आहे हा त्रास थांवण्याचे साकडे यावेळी त्यांनी आ.लोणीकरांना घातले. तुर,हरभरा खरेदीतही नाङ्गेड मार्ङ्गत खरेदी करणार्या संस्थेचे सचिव अनभुले हे शेतकर्यांच्या बाबतीत दुजाभाव करीत असल्याचे शेतकरी लक्ष्मण शेळके यांनी आ.लोणीकर यांच्याकडे गार्हाणे मांडले. शेतकरी दत्ता शिंदे म्हणाले की नाङ्गेड खरेदी केंद्रावर चाळणीच्या नावाखाली प्रती क्विंटल 200 रूपयांची लुट केली जात असल्याचे सांगितले.खरेदी संस्थेचे सचिव अनभुले व कृ.उ.बा.स. मोजमापाच्या नावाखाली लुट करत असल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या आ.लोणीकर यांनी अधिकार्यांना हा अंतिम इशारा आसून आपण शेतकर्यांवर आन्याय करीत आसल्याचे निदर्शनास आल्यास आपण होणार्या परीनामाला सामोरे जा असा दम उपस्थित संबधीत अधिकार्यांना दिला.
महाराष्ट्र सरकारने कापुस खरेदी केंद्रे सुरू करावी
महाराष्ट्र सरकारने शेतकर्यांचे हित लक्षात घेता आगोदर कापुस खरेदी केंद्रे सुरू केली करायवला पाहिजे होती आपण या संदर्भात वेळोवेळी मागणीकरूनही राज्यसरकारने या बाबतीत कानाडोळा केल्यामुळे आजची हि परिस्थिती उदभवली असुन यावरून राज्यसरकारला शेतकर्याविषयी काही देणे घेणे नसल्याचे सिध्द होते असेही ते म्हणाले.यावेळी उपविभागिय अधिकारी भाऊसाहेब जाधव,तहसीलदार रूपा चिञक ,बद्रीनारायण ढवळे,ता.अध्यक्ष रमेश भापकर,सभापती रंगनाथ येवले,अशोक बरकुले,सूरेश सोळंके,संपत टकले,शञुघ्न कणसे,सुर्यभान कदम,सहाय्यक निबंधक,श्री वाघमारे,सिसिआय केंद्राचे ग्रेडर प्रितम सुरांजे कृ.उ.बा.स.सचिव लिपने,नाङ्गेड खरेदी संस्थेचे सचिव अनभुले गणेश कदम,यांच्या सह अनेक शेतकर्यांची उपस्थिती होती.
Leave a comment