जालना । वार्ताहर
घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील राणी उंचेगाव येथे भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर माजी आमदार विलासराव खरात यांच्या आदेशावरून बँक ऑङ्ग महाराष्ट्र राणी उंचेगाव शाखा येथे शेतकर्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्यात यावे यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले व शाखा व्यवस्थापक पटेल साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आंदोलन भाजपा विधानसभा संपर्क प्रमुख ह.भ.प.रमेश महाराज वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने व रोजगार हमी योजना तालुकाध्यक्ष अंकुशराव बोबडे, युवा मोर्चा उपजिल्हाध्यक्ष गोविंद ढेंबरे, भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष कैलासराव शेळके, लक्ष्मण काटे,गणेश मेंगडे, भगवान माकोडे, रामेश्वर गरड, नाना वैद्य, योगेश ढोणे, विठ्ठल कामठे, खेमा कामठे, विलास चव्हाण, जयराम कोरडे, सुभाष सपाटे, दिनकर वाघ, रामदास वाघ, ओमप्रकाश माकोडे, सदाशिव यादव, कृष्णा माकोडे, शिवाजी राठोड,आयाजभाई व मोठ्या संख्येने उपस्थित शेतकरी व भाजपा कार्यकर्ते प्रमुख उपस्थिती होती.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment