जालना । वार्ताहर

शेतकर्‍यांचे पिककर्ज वाटपास तात्काळ गती देऊन नियमित कर्जङ्गेड करणार्‍या शेतकर्‍यास प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपये तात्काळ अदा करण्याची मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भास्करराव पाटील दानवे यांनी जालना शहरातील जुना मोंढा भागातील बँक ऑङ्ग महाराष्ट्र जिल्हा आग्रनी बँकेचे सहायक व्यवस्थापक श्री.तावरे यांना निवेदन देऊन केली. यावेळी जालना शहराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष राजेश राऊत, भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, नगरसेवक सतीश जाधव, सिद्धिविनायक मुळे, नगरसेविका सौ.संध्या संजय देठे, शशिकांत घुगे, चंपालाल भगत, अतिक खान, गोवर्धन कोल्हे, बाबासाहेब कोलते, सुनील पवार, बाबुराव खरात, संजय आटोळे, रोषण चौधरी, भागवत बावणे, रोहित नलावडे,  आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

भाजपा जालना जिल्ह्याच्या वतीने आज जालना ग्रामीण व जालना शहर व जिल्ह्यातील भोकरदन जाङ्ग्राबाद, अंबड, घनसावंगी व जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेच्या समोर भाजपा पदाधिकारी व शेतकर्‍यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकास ‘दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जालना तालुक्यात व जिल्ह्यामध्ये पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठी चे शेतकरी वर्गाचे कर्जवाटप ठप्प आहे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महा विकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन तात्काळ पिक कर्ज वाटपाचे काम सुरू करण्याचे बँकांना निर्देश द्यावेत व कर्जमाङ्गी योजनेची अंमलबजावणी करावी शासनाने कर्जमाङ्गी करून शेतकर्‍यांना पीक कर्ज द्यावे राज्यात कोरोना चे संकट आहे म्हणून पाऊस खरीप हंगाम आणि शेतीचे कामे थांबत नाहीत राज्य सरकारच्या बांधावर खत आणि बियाणे या योजनेचा बोजवारा उडालेला आहे पीक कर्जाचे वाटप ठप्प झाले आहे त्यामुळे भाजपाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे जालना जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा कापूस घरातच पडून आहे शेतकर्‍यांना कापूस व्यापार्‍यांना विकावा लागत आहे खरीप पीक कर्ज वाटप संथ गतीने चालू आहेत शासनाच्या नावे कर्ज मांडावे असे बँकांना सांगितले बँकांनी या शासन निर्णयाला केराची टोपली दाखविली अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना हेक्टरी कोरडवाहू रुपये 25 हजार व ङ्गळबाग यांना 50 हजाराची घोषणा शासनाने केली होती ती देण्यास शासन विसरले आहे, तरी तात्काळ अंमलबजावणी करून शासनाने दिलेल्या आश्‍वासनाची अंमलबजावणी करून जालना तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकर्‍यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्यात यावे ठप्प झालेले पीक कर्ज वाटप गती देण्यात यावी व कर्ज माङ्गी झालेल्या शेतकर्‍यांची यादी जाहीर करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली यावेळी सुरेश कदम, संजय डोंगरे, नामदेव ढाकणे, शरद सोनुने, वसंत शिंदे, कैलास उबाळे, नामदेव नागवे, बद्री वाघ, दौलत भुतेकर, कुंडलिक खरात, आदींसह पदाधिकारी व शेतकर्‍यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.