नऊ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सक
जालना । वार्ताहर
जिल्हा सामान्य रुग्णालयातून जालना शहरातील अलंकार टॉकीज परिसरातील-1, राज्य राखीव पोलीस दलातील3 जवान,समर्थनगर -1 ,उतार गल्ली 2 सोनक पिंपळगाव ता. अंबड येथील -2,अशा एकुण नऊ रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील तेली समाज रामनगर परिसरातील-1, संभाजीनगर -2, इंद्रप्रित अपार्टमेंट इंदेवाडी येथील-2, नुतन कॉलनी भोकरदन 1 अशा एकुण सहा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
भोकरदन शहरातील नुतन कॉलनी परिसरातील रहिवासी असलेल्या 60 वर्षीय पुरुष रुग्णास श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यास दि. 19 जुन 2020 रोजी भोकरदन शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दि.22 जुन 2020 रोजी संबंधित रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यास जालना येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र तेथुन त्या रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात संदर्भित केले. अत्यावस्थ परिस्थितीतील या रुग्णास दि. 22 जुन 2020 रोजी सामान्य रुग्णालयात आय.सी.यु. मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच दि. 22 जुन 2020 रोजी रात्री 10.20 मिनिटांनी त्यांचा मृत्यु झाला, मृत्युनंतर लगेचच त्यांच्या लाळेचा नमुना घेऊन प्रयोगशाळेकडे तपासण्यासाठी औरंगाबाद येथे दि. 22 जुन 2020 रोजी पाठविला होता. त्याचा अहवाल दि. 23 जुन 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण3740 असुन सध्या रुग्णालयात -108, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1420, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या92, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -4593, एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने06 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -384, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -4101 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-404 एकुण प्रलंबित नमुने-104, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1300. 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती13, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती 1212, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-75, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-225, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत20, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -108, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-136, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या- 9, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-257, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या -109, तर संदर्भित रेङ्गर केलेली रुग्ण संख्या-06, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-10471, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 12 एवढी आहे. आज संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 225 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-14, शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना-19, संत रामदास वसतिगृह जालना-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-00, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-26, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना59 मॉडेल स्कुल परतुर-06, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-02, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-11, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-15 मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी00,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन -13, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाङ्ग्राबाद -00, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाङ्ग्राबाद-12, जिजाऊ इंग्लिश स्कुल जाङ्ग्राबाद 00, शेठ इ.बी.के. विद्यालय टेंभुर्णी -04. आय.टी. आय. कॉलेज जाङ्ग्राबाद- 41 लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 171 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 863 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 827 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख 61 हजार 430 असा एकुण 3 लाख 88 हजार 238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Leave a comment