सात कृषी सेवा केंद्रांना नोटिसा बजावल्या; कारवाई मात्र गुलदस्त्यात
कृषीमंत्र्याकडे तक्रार करण्याची शेतकर्यांची मागणी
तिर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील सात कृषी सेवा केंद्रातून युरिया खत असतानाही दुकानदारांनी मात्र युरिया खताचा बरोबर लिंकिंग याशिवाय मिळणार नाही या बाबत दैनिक लोकप्रश्नमध्ये बातमी दि.13 जून 2020 रोजी येताच जालना जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे तसेच गुण नियंत्रक कृषी तज्ञ एस.डी. गराडे यांनी तात्काळ तीर्थपुरी येथे येऊन सात कृषी सेवा केंद्राची तपासणी करून त्या तपासणीत विनापरवाना नोंदणीकृत भूसुधार साठा आढळून आला तसेच कृषी सेवा केंद्रात शासनाचे नियम धाब्यावर बसून कृषी केंद्र चालक शासनाचे नियमाचे पालन न केल्यामुळे जिल्हा कृषी अधिकारी शिंदे यांनी सात कृषी सेवा केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
दहा दिवस उलटले असतानाही संबंधित कृषी सेवा केंद्र चालकावर कारवाई मात्र गुलदस्त्यात अडकली कशी यावरून कृषिमंत्री दादाजी ङ्गुसे यांच्याकडे तक्रार करणार असल्याची शेतकर्यांमधून सांगितले जाते सविस्तर माहिती अशी की तीर्थपुरी काही दुकानदाराकडे युरिया खत असतानाही तसेच विना परवाना नोंदणीकृत खताचा साठा करून ती खते शेतकर्यांच्या माथी मारून आर्थिक लूट केली जात असल्याची कृषी अधिकार्यांच्या नजरेस आले आहे ही शेतकर्यांची ङ्गसवणूक केली जात असताना तसेच या महा विकास आघाडी सरकारच्या काळात शेतकर्यावर खते असताना लींकिन च्या नावाखाली काळाबाजार व शेतकर्यांची आर्थिक लूट व भूसुधारक खताची विक्री हे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या मतदार संघात कृषी सेवा केंद्रातून केली जाते ही शेतकर्यांची चेष्टाच म्हणावी यावर काल दिनांक 21 सहा 2020 रोजी कृषी मंत्री दादाजी ङ्गुसे यांनी शेतकर्याचा रूपात जाऊन औरंगाबाद येथे कृषी सेवा केंद्रात युरिया खते मागणी केली पण संबंधित केंद्रचालकांनी खताचा साठा असतानाही त्यांना युरिया खत नसल्याची नकार देऊन अपमानित केली कृषिमंत्र्यां ना ङ्गसवणूक केली जाते सर्वसाधारण शेतकर्यांची ग्रामीण भागात काय हाल असते हे सांगणे कठीण आहे या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात संबंधित कृषी सेवा केंद्रावर कृषी अधिकार्यांची नियंत्रण नसल्याची दिसून येते पण पाच वर्ष भाजप सरकार सत्तेवर असताना अशी वेळ बळीराजा वर आलेली नव्हती आज कृषी केंद्रावर संपूर्ण सावळागोंधळ काही दुकानदार मुद्दा होऊन शेतकर्यांची अडवणूक केली जाते खताची बियाणे सोयाबीन नामांकित बियाणे असतानाही शेतकर्यांना चढ्या भावाने विक्री केली जाते युरिया खत असतानाही दिली जात नाही ही हा सर्व कृषी केंद्र चालकाचा मनमानी कारभार सुरू असून या सात कृषी सेवा केंद्रांना नोटिसा देऊनही त्यांच्यावर मात्र दहा दिवस उलटत आले तरीही ही काहीच ठोस कारवाई जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्याकडून केली का नाही भोकरदन मध्ये बोगस बियाणे प्रकरणी पोलीस कारवाई तात्काळ होते पण नोटीस बजावून कारवाई का केली जात नाही याबद्दल शेतकर्यात उलट-सुलट चर्चा केली जात असून या प्रकरणी राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब ङ्गुसे यांच्याकडे काही शेतकरी तक्रारी करणार असल्याचे समजते यामुळे दादा शेतकर्याकडे लक्ष द्या संबंधित दुकानदारावर कारवाई करा एवढीच मागणी शेतकर्यांमधून जोर धरत आहे नसता या दुकानदारांना अभय दिल्यास शेतकर्याची लूट कमी होण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात वाढ होईल.
काळ्या मातीशी बेईमानी करणार्या गद्दारांवर गुन्हे दाखल करा
मागील चार-पाच वर्षांपासून कोरड्या दुष्काळाने हैराण झालेला शेतकरी यावर्षी पाऊस वेळेवर झाल्याने आनंदी होता. शेतकर्यांनी अवाजवी भावात बियाणे खरेदी करून पेरणी केली. अनेक शेतकर्यांनी सोयाबीन मोठ्याप्रमाणात पेरले आहे. त्यातील सुमारे नव्वद टक्के शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीन उगवलेच नाही. अनेक व्यापार्यांनी बोगस बियाणे तेही चढ्या भावात देऊन शेतकर्यांना लुबाडले आहे. लिंकींग च्या नावावर बोगस खते शेतकऱयांच्या माथी मारली, युरियाखताचा तुटवडा केला, या सर्व भ्रष्टाचारात बियाणे खते पुरवणारी कंपनी, विकणारा व्यापारी आणि प्रशासन सहभागी आहे.ज्या प्रमाणे एखाद्या व्यक्ती ने आर्थिक ङ्गसवणूक केली तर 420 सारखे गुन्हे दाखल करण्याची तरतूद कायद्यात आहे, मग आमच्या माय बाप शेतकर्यांना हे बियाणे सदोष देऊन आर्थिक ङ्गसवणूक करत आहेत या ङ्गसवणूकीमूळे अनेक शेतकर्यांनी 2 आत्महत्या केल्या आहेत, परंतु कृषी कायद्यात शेतकर्याला ङ्गसवणूक केली तर कुठेही 420 सारखे गुन्हे दाखल करायची तरतूद नाही . केवळ 500 दंड कायद्यात आहेत असे कायदे बदलून कठोर कायदे करण्याची गरज आहे, त्यामूळे काळ्या मातीशी बेईमानी करणार्या मुजोरी कंपन्या ,व्यापारांना अधिकार्यावर 420 / आत्महत्येस जबाबदार 304 सारखे गुन्हे दाखल करा अप्पासाहेब कुढेकर पाटील, अ.भा. छावा संघटक , मराठा मोर्चा समनव्यक, शेतकरी सुकाणू समिती सदस्य.
Leave a comment