दुष्काळी परिस्थिती मुळे तालुक्यात गव्हाचे उत्पन्नच नाही
आष्टी / रघुनाथ कर्डिले
आष्टी तालुक्यात कोरोना व्हायरस संक्रमित रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या पात्र लाभार्थ्यांसाठी माहे एप्रिल २०२० करीता प्रतिसदस्य ५ किलो तांदूळ ,व नियमितपणे मिळणाऱ्या धान्याचे मोफत वितरण सुरू करण्यात आले आहे. परंतु रेशन दुकानावर तांदळापेक्षा गव्हाला जास्त मागणी असल्याचे चित्र दिसून येत आहे याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागामध्ये तांदुळाचा भात खाण्याचे प्रमाण कमी असून गहू खाण्याचे प्रमाण जास्त आहे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना तांदूळ मिळाल्याने गव्हाची मागणी वाढत आहे.
आष्टी तालुक्यातील अंत्योदय अन्न योजनेचे ३ हजार ६३३ कार्डधारक व १३ हजार २८५ कुटुंब सदस्य संख्या आहे, प्राधान्य अन्न योजनेचे ३७ हजार ४२३ कार्डधारक व १ लाख ४३ हजार ९७२ कुटुंब सदस्य संख्या आहे. आष्टी तालुक्यात ४१ हजार ५६ कुंटुबाना तर १ लाख ५७ हजार २५७ सदस्य यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच जे नियमित ऑनलाईन धान्य उचलतात अशाच कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.तर तालुक्यात एपीएल शेतकरी १९ हजार १४० कार्डधारक व ८० हजार ८७७ सदस्य संख्या आहे. या योजनेच्या कार्डधारकासाठी मोफत तांदूळ धान्याचा लाभ देण्यात येणार नाही. एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेशानुसार नियतन मंजूर झाल्यानंतर नियमित धान्य वितरीत करण्यात येणार आहे. धान्याच्या लाभापासून पात्र कार्डधारक वंचित राहणार नाहीत याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. असे पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे यांनी सांगितले. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत सर्व कार्डधारकांना तांदूळ वितरित करण्यासाठी पुरवठा विभागातील अव्वल कारकून आदिनाथ बांदल,भगीरथ धारक, गोदाम किपर उमेश धलपे, कपिल गोडसे, नंदकुमार कदम हे परिश्रम घेत आहेत.
★★★★★
ज्यांना रेशन कार्ड नाही त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर चौदाव्या वित्त आयोगातून त्यांना धान्य उपलब्ध करून द्यावे असे निर्देशित केले आहे.
चौकट : शासन सध्या 2011 च्या जनगणनेनुसार दुकानदारांना माल देत आहे.परंतु कार्डधारकांनी ऑनलाइन नावे कुपन मध्ये समाविष्ट केले आहेत त्यामुळे ऑनलाइन ला जेवढे प्रति माणसे दाखवत आहेत तेवढे धान्य शासनाने द्यायला पाहिजे.
कडा शहरात बुधवार पासून रेशन वाटप करण्यास सुरुवात केली असुन दुकानासमोर मार्किंग करण्यात आले आहे.ठराविक अंतरावर लोकांना रांगेत उभे करून शासन नियमानुसार धान्य वाटप करण्यात येत आहे.परंतु ज्यांना रेशन कार्ड नाही त्यांना शासनाने धान्य द्यावेत आशा मागण्या आमच्याकडे येत आहेत.
संजय ढोबळे
स्वस्त धान्य दुकानदार
Leave a comment