एपिआय संदिप काळे ,व अन्नदाते संदीप मुळे यांचा स्तुत्य उपक्रम
धोंडराई | शाम जाधव
कोरोना विषाणु च्या अतिप्रसारामुळे देशभरासह राज्यात देखील लाॅकडाउन लागु केलेले आहे.यामध्येच हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांसाठी अनेक वेगवेगळ्या सामाजिक संस्था तसेच अनेक दानशुर व्यक्ती गरजुंच्या मदतीला धावताना पाहिले असतील माणसाला जर एकवेळचे अन्न मिळाले नाही तर तो "मला खायला द्या "असे कोणालातरी म्हणु शकतो.परंतु मुके जनावरे अर्थात कुत्रे , गाय वगैरे हे पशु प्राणी कोणाकडे खायला मागणार आणि आपण आतापर्यंत गरिब कुटुंबाला अन्न धान्य दिल्याचे अनेक वेळा पाहिले असेलच परंतु गरजु कुटुंबाप्रमाणेच भुकेलेल्या जनावरांवरांचीही भुक भागविण्याचा निश्चय गेवराई पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप काळे व संदीप मुळे यांनी केला.संदिप मुळे(अन्नदाते ) हे दररोज सातशे खिचडी पाॅकेट तर प्राण्यांना पोळ्याचे वाटप करतात यासाठी त्यांना दररोज सरासरी वीस हजार रुपये खर्च येतो.सदरील अन्न हे शहरातील व ग्रामीण भागातील गरजु लोकांना व प्राण्यांना दिले जात आहे. असे असताना एपीआय संदिप काळे व अन्नदाते संदीप मुळे यांनी एकप्रकारे तालुक्यासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे
Leave a comment