माजलगाव | उमेश जेथलिया
मंत्रालय, अनेक मनपा परिसर सह अनेक गावांत मास्क न लावनरांना 200 ते 1000 रु पर्यत दंड आकारला जात असतानाच आज माजलगाव मध्ये पोलीस प्रशासनाने पावरवाडी जवळील एका पेट्रोल पम्प वर मास्क न लावलेल्या तरुणांना अंगावरील शर्ट काडून तोंडाला बांधण्यास बाध्य केले त्यानंतर च पेट्रोल दिले
ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पवरवाडी जवळील अवधूत पेट्रोलियम वर गस्ती वर असताना ग्रामीण चे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी अचानक भेट दिली यावेळी काही पास धारक किराणा,दूध विक्रेते युवक याठिकाणी पेट्रोल साठी रांगेत उभे होते.काही तरुणांच्या तोंडावर मास्क नसल्याचे पाहून पी आय पाटील यांनी मास्क लावले तर पेट्रोल मिळेल असे संगितले.यावर त्यांनी उपाय म्हणून शर्ट काडून तोंडाला बांधण्यास सांगितले असता काही युवकांनी लगेच शर्ट काडून तोंडाला बांधले.कोरोना ला रोखण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत असताना जनता अजून ही गंभीर नसल्याचे दिसून येते नाईलाजाने प्रशासनास कठोर पावले उचलावी लागत आहेत त्याचेच हे एक उदाहरण होते.अजून ही फळ-भाजीपाला विक्रेते चेहऱ्यास मास्क लावत नसल्याचे दिसून येत आहे.उध्या पासून प्रशासना स आजच्या प्रमाणे प्रत्येक मास्क नसणाऱ्या व्यक्तीस शिक्षा देण्याची वेळ येते की काय असेच वाटत आहे
Leave a comment