सात रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज-जिल्हा शल्य चिकित्सक
जालना । वार्ताहर
जिल्हा सामान्य रुग्णालयातुन पारडगाव ता. घनसावंगी येथील -1, राजेगाव ता. घनसावंगी -1, सिंदखेडराजा येथील -1, जालना शहरातील पोलीस मुख्यालयातील -1, जयनगर -1, लक्ष्मीनारायण नगर 1, काद्राबाद 1 अशा एकुण 7 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दि. 20 जुन 2020 रोजी जालना शहरातील रामनगर विनकर कॉलनी येथील 1, देहेडकरवाडी -1, नरीमाननगर- 1 रहेमानगंज-1, कुरेशी मोहल्ला -1 अशा एकुण पाच व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.
जालना शहरातील आनंदनगर येथील रहिवासी असलेला 58 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे अत्यावस्थ परिस्थितीत दि. 8 जुन 2020 रोजी सामान्य रुग्णालयात आय. सी. यु. मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी औरंगाबाद येथे दि. 9 जुन 2020 रोजी पाठवला होता. त्याचा अहवाल दि. 10 जुन 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. संबंधित रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा असताना त्याचा मृत्यु दि. 20 जुन 2020 रोजी झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण3598, असुन सध्या रुग्णालयात -115, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1383, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 55, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -4372, एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने5 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -358, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -3953, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-400, एकुण प्रलंबित नमुने-57, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1257. 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 9, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती 1148, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -30, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-270, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत 27, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-115, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-5, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-7, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-232, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-110, तर संदर्भित रेङ्गर केलेली रुग्ण संख्या -05, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-8754, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 11 एवढी आहे.
आज संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 270 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-85, शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना- 7,संत रामदास वसतिगृह जालना-4, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-16, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-13, मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-08, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-25, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-14, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी8, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन -16,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाङ्ग्राबाद -1, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाङ्ग्राबाद - 02, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना 40, जिजाऊ इंग्लिश स्कुल जाङ्ग्राबाद 9, शेठ इ.बी.के. विद्यालय टेंभुर्णी - 19 लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 170 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 845 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 825 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख 42 हजार 230 असा एकुण 3 लाख 69 हजार 38 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Leave a comment