जालना । वार्ताहर

राज्यसेवा स्पर्धा परीक्षा मध्ये जालना जिल्ह्यातील कल्याण आसाराम काळदाते  रा. आंबा ता. परतुर यांनी राज्यसेवा 2019-20 मध्ये घवघवीत यश संपादन केले असून त्यांची निवड नायब तहसीलदार पदी झाली आहे. कल्याण काळदाते हे एक सर्वसामान्य घरातील असून त्यांचे आई-वडील शेतकरी आहे. काळदाते यांचे प्राथमिक शिक्षण आंब्याच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत झाले, नंतर पदवीच्या शिक्षणासाठी त्यांची निवड वाल्मिकी अभियांत्रिकी महाविद्यालय, सातारा येथे झाली तिथे त्यांनी कॅम्प्यूटर सायन्सची पदवी मिळविली. 

त्यानंतर एक वर्षासाठी त्यांनी टीसीएस कंपनीमध्ये जॉब केला, पण हे काम करत असताना समाजाविषयी असणारी धडपड त्यांना शांत बसू देत नव्हती म्हणून त्यांनी हा जॉब सोडला आणि राज्यसेवा परीक्षेच्या तयारीसाठी लागले 2017 आणि 2018 मध्ये त्यांनी राज्यसेवेच्या प्रिलिम एक्झाम पास केल्या व मुख्य परीकक्षेसाठी पात्र झाले पण त्यांना मुख्य परिक्षेमधून कमी मार्क मिळाल्यामुळे माघार घ्यावी लागली, पण ते शांत बसले नाही. पुढे त्यांनी कठोर मेहनत करून  2019-20 मध्ये परिक्षा दिली आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले व नायब तहसीलदार झाले. त्यांनी केलेल्या मेहनतीला ङ्गळ मिळाले. त्यांची नायब तहसीलदार म्हणून निवड झाल्याने त्यांचे महादेव भुतेकरसह त्यांच्या मित्र परिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.