मोठा आर्थिक ङ्गटका बसला तरीही कुठेही दखल नाही
परतूर । वार्ताहर
लग्न सराईच्या काळातच लॉकडाऊन झाल्याने सर्वात मोठा आघात हा मंगल कार्यालय मालकावर झालेला आहे, लाखोंचे नुकसान होऊनही यांच्याकडे बघायला कोणी तयार नसल्याचे दुर्दैवी चित्र यांच्या वाट्याला आले आहे.
तीन महिन्यांच्या लॉकडाऊन काळ हा मंगलकार्यालय चालकाचे आर्थिक कंबरडे मोडणारा ठरला आहे. लाखोंचे नुकसान होऊन ही त्यांच्या जखमेवर ङ्गुंकर घालणारा कोणी पुढे न आल्याने सर्वात जास्त वाईट वाटत असल्याची भावना या मंडळींची झालेली आहे. परतुर शहरातील मंगल कार्यालयाचा विचार करायचा तर शहरात लहान मोठे चार मंगल कार्यालय आहेत,त्यांची लग्न सराईतली उलाढाल ही एकूण कोटीच्या घरात आहे, लग्न कार्यालयाच्या देखभालीचा वर्षभराचा खर्च लाखोंचा करावा लागतो तर मार्च ते मे महिन्यात लग्नाच्या भाड्यातून कमाई केली जाते.परंतु यावेळी त्यांची सारी गणिते उलटी पडली, ऐन लग्न सराईच्या काळात तीन महिने लॉकडाऊन झाले आणि लाखोंची गुंतवणूक केलेली मंगल कार्यालये ओस पडली, करार केलेले पैसेही त्यांना परत करावे लागले. सर्वात मोठा आर्थिक ङ्गटका बसलेल्या या व्यवसायिकांचे दुर्दैव म्हणजे यांच्या नुकसानीची दखल कोणी घेतली नाही.शासन स्तरावर सर्व नुकसानीच्या चर्चा होत असताना मंगल कार्यालयाचे नुकसानीचा साधा उल्लेख केला जात नाही याचे वाईट वाटत असल्याचे शहरातील वरद विनायक मंगल कार्यालयाचे संचालक विनायक काळे यांनी सांगितले. मोठी गुंतवणूक करून लाखोंचे नुकसान झाले असताना कोणत्याही स्तरावरून कोणी याची साधी दखल घ्यायला तयार नाही याचे मोठे दुःख असल्याचे ते म्हणाले. उद्योजक, व्यवसाईकाकडे बघण्याचा हा दृष्टिकोन बदलला पाहिजे असं मत काळे यांनी व्यक्त केले.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment