बदनापूर । वार्ताहर

बदनापूर पोलिस ठाण्याच्या हददीतील खामगाव येथील किराणा दुकानात व पिठाच्या गिरणीतून अवैधरीत्या देशी दारूची विक्री होत असल्याची घटना बदनापूर पोलिसांनी उघडकीस आणली असून चोरटी देशी दारू विक्री करणार्‍या एकाला अटक करण्यात आली असून एक ङ्गरार आहे. बदनापूर  तालुक्यातील मौजे खामगाव येथील बसस्टँडजवळ असलेल्या उदय किराणा दुकानातून अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती गुप्त खबर्‍यामार्ङ्गत पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांनी मिळालेली होती. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक खेडकर, खरात, चरनसिंग बमनावत व गजानन भवरे यांनी 19 जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या किराणा दुकानावर छापा मारला असता त्या ठिकाणी बजरंग मरदानसिंग खोकड हा किराणा दुकानातून देशी दारूची चोरटी विक्री करत असल्याचे दिसून आले. त्याला ताब्यात घेऊन दुकानाची झडती घेतली असता या दुकानातून देशी दारू भिंगरी-संत्रा असे लिहिलेल्या 58 बॉटल्या मिळून आल्या. 

या दरम्यानच या किराणा दुकानाच्या पाठीमागे असलेल्या पिठाच्या गिरणीच्या रुममधून सुरेश हिरालाल निम्रट हा प्रण चोरटी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरून या पिठाच्या गिरणीतील रूमवरही पोलिस पथकाने छापा मारला. या ठिकाणी तपासणी केली येथे 102 दारूच्या बाटल्या मिळून आल्या असल्यातरी सुरेश निम्रट हा मात्र पोलिसांना पाहून पळून जाण्यात यशस्वी झाला. एकाच गावात दोन ठिकाणी देशी दारूच्या साठयावर बदनापूर पोलिसांनी छापा मारून जवळपास 10 हजार रुपये किंमतीच्या 160 बॉटल देशी दारूसाठा जप्त केला आहे. या बाबत बजरंग खोकड याला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा आरोपी पळून गेलेला आहे. या बाबत पोलिसांनी जिल्ळाधिकारी यांनी कोव्हिड  19 उपायायेजना नियमानुसार प्रतिबंधित आदेश तोडणे व दारूची अवैध चोरटी विक्री करणे बाबत पोलिस हवालदार गजानन भवरे यांनी दाखल केलेल्या ङ्गिर्यादीवरून भादंवि 188, 269 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मारुती खेडकर हे करत आहेत. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.