जालना । वार्ताहर
ढग ङ्गुटीने बदनापूर व अंबड तालुक्यातील अनेक गावांत शेतकर्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून त्या शेतकर्याच्या पिकाचे पंचनामे करून शासनाने मदत करावी अशी मागणी होत आहे. काल दि 18 रोजी वादळी वार्यासह झालेल्या ढग ङ्गुटीने बदनापूर व अंबड तालुक्यातील देशगव्हान, चिकणगाव, लोणारभायगाव, बदापूर, आवा, अंतरवाला आवा, आलमगाव, चांभारवाडी, साडेसावंगी, हस्तपोखरी, शिराढोन कर्जत अशा अनेक गावांमध्ये काल झालेल्या अतिवृष्टीमुळे, पेरणी झालेल्या व शेतकर्यांच्या शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी आ.नारायण कुचे यांनी करून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार साहेब यांना करण्यात आले.
यावेळी सोबत जि.प.सदस्य अवधूत नाना खडके, तहसीलदार शिंदे साहेब,कृषी मंडळ अधिकारी वैद्य साहेब,राजाराम दादा जाधव,रामप्रसाद दासपुते,सुगंन संचेती,नारायण जाधव,शिवाजी जाधव,नंदू खडके,उपसरपंच जाधव व सर्वअधिकारी, कर्मचारी ,पदाधिकारी ,शेतकरी उपस्थित होते.
Leave a comment