जिल्ह्यातील रूग्णांची संख्या आता 353 वर पोहचली
जालना । वार्ताहर
शहरातील खडकपुरा भागात आज दि 19 रोजी सकाळी संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने येथील राहिवाशांमधून चिंता व्यक्त केली जात असतांनाच आज सायंकाळी याच भागात आणखी तीन संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यामुळे रहिवाशी चांगलेच धास्तावले असल्याचे चित्र दिसून आले आहे जालन्यात आज शुक्रवारी सकाळी 26 संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून या 26 पैकी तब्बल 25 रुग्ण हे जालना शहरातील असल्याचे स्पष्ट झाले होते.
आता सायंकाळी खडकपुरा भागात आणखी तीन संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून हे सर्व रुग्ण आपसात नातेवाईक असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे. जिल्हा रुग्णालयाकडे प्रयोग शाळेकडन आज दि 19 रोजी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जालना शहरातील खडकपुरा येथील 6,आंनद नगर 3,लक्कडकोट 4, समर्थनगर 2, रामनगर 5 कन्हेय्यानगर,आरपी रोड, क्रांतीनगर,सरकारी रुग्णालयातील दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या डॉक्टर चा 1 नातेवाईक मंगलबाजार,जाङ्गराबाद तालुक्यातील टेभूर्णी येथील प्रत्येकी एक असे एकूण 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.सायंकाळी आणखी तीन रूग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता वाढून 353 वर पोहचली आहे
Leave a comment