जालना । वार्ताहर
सैनिकी मुलांचे वसतिगृह जालना येथे निव्व्ळ कंत्राटी,रोजंदारी तत्वावर तसेच एकत्रीत मानधनावर खालील पदे शैक्षणिक वर्ष 2020-2021 करीता भरणे आहेत. या पदाकरीता जिल्हयातील माजी सैनिक,माजी सैनिक विधवा पत्नी तसेच इतर इच्छुकांनी दिनांक 25 जून 2020 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जालना येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी केले आहे.
वसतिगृह अधिक्षक पदासाठी संरक्षण दलामध्ये जे सी ओ या पदावर कमीत कमी पाच वर्ष सेवा, वय 52 वर्षापेक्षा कमी - मासिक मानधन रूपये 12872 रुपये, सहायक वसतिगृह अधिक्षक पदासाठी माजी हवालदार- मासिक मानधन 9902 रूपये, चौकीदार पदासाठी माजी सैनिक असावा, मासिक मानधन 8911 रूपये, सङ्गाइवाला पदासाठी माजी सैनिक, इतर नारी- मानधन रूपये 5658, स्वंयपाकी पदासाठी, माजी सैनिक विधवा पत्नी,इतर नारी- मानधन 5941 रूपये देण्यात येणार आहे. तसेच सैनिकी लॉन जालना येथे रोजंदारी तत्वावर माळी पदासाठी माजी सैनिक अथवा इतर नागरीक- मानधन 5658 रूपये तर सङ्गाइ कामगार पदासाठी उमेदवार माजी सैनिक अथवा इतर नारी - मानधन 5658 रुपये एवढे मानधन देण्यात येणार आहे. अर्जाच्या छाननी नंतर मुलाखती, प्रात्याक्षिक करीता कळविले जाईल. या पदांसाठी उपरोक्त वयोमर्यादा 55 वर्षापर्यंत ठरविण्यात आली असल्याचेही प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
Leave a comment