नाव्हा येथे सोयाबीन आणि तूर पिकांबाबत शेती शाळेचा परिसरातील शेतकर्यांनी घेतला लाभ !
जालना । वार्ताहर
शास्त्रशुुध्द पध्दतीने शेती केली तर ती कधीच तोट्यात येत नाही. त्यामुळे शेतकर्यांनी आधुनिक पध्दतीचा अवलंब करुन शेती व्यवसाय करावा, असे आवाहन कृषी सहाय्यक श्रीमती सी.ए. चव्हाण यांनी केले. नाव्हा (ता.जालना) येथे नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पांतर्गत जिल्हा कृषी अधिक्षक श्री. बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी एन. आर. कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतशिल शेतकरी जनार्दन भुतेकर यांच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या सोयाबीन आणि तूर पिकांच्या शेती शाळेत मार्गदर्शन करतांना श्रीमती चव्हाण बोलत होत्या. यावेळी युवा सेनेचे समन्वयक तथा नाव्ह्याचे उपसरपंच अंकुश पाचङ्गुले, कैलास भुतेकर, जनार्दन भुतेकर, रखमाजी ढोबळे, गणेश सुरसे, निवृत्ती सुरसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रीमती चव्हाण म्हणाल्या की, नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प शेतकर्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा प्रकल्प आहे. शेतकर्यांनी पीकाची लागड किंवा पेरणी करतांना रुंद सरी ठेवावी आणि वरवा पध्दत स्वीकारल्यास त्याचे मोठे ङ्गायदे होतात. पीकाची उगवण क्षमता देखील वाढते, असे सांगून श्रीमती चव्हाण यांनी शेती तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर माहिती देऊन आधुनिक पध्दतीने शेती केल्यास त्याचे कसे ङ्गायदे होतात, हेही उपस्थित शेतकर्यांना पटवून सांगितले. यावेळी बोलतांना युवा सेनेचे समन्वयक तथा नाव्ह्याचे उपसरपंच अंकुश पाचङ्गुले म्हणाले की, शेती हा तोट्यात जाणारा व्यवसाय असल्याचे मत अनेकांनी बनवून घेतले आहे. वास्तविक पाहता शास्त्रशुध्द पध्दतीने शेती केल्यास शेतकर्यांना कधीही तोट्यात जाण्याचे कारण नाही. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी अल्पशा जमीनीत काम करुन लाखो- करोडोचे उत्पन्न घेतो. मग आपणच मागे का? याचा विचार शेतकर्यांनी केला पाहिजे, असे सांगून श्री. पाचङ्गुले यांनी कोरोना या आजाराबद्दल शेतकर्यांनी जागृत राहून शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास त्याचा निश्चितच ङ्गायदा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकर्याने मास्कचा वापर करतांनाच सॅनिटायझर देखील वापरले पाहिजे. जेणे करुन हा संसर्गजन्य आजार आपल्याकडे ङ्गिरकणार नाही. त्यामुळे शेतकर्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही शेवटी श्री. पाचङ्गुले यांनी केले. या शेती शाळेस नाव्ह्यासह परिसरातील शेतकर्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Leave a comment