मुंबई
राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सामोरं जात आहे. राज्यात करोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्य सरकारनं तातडीनं पावलं टाकतं महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्यानं जनतेला देत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कामाला लोकांकडून दाद मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपाकडून ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका केली जात आहेत. मात्र, भाजपाच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरे नवीन पायंडा पाडतील, असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात करोनाच्या संकटानं डोकं वर काढल्यानंतर राज्य सरकार युद्ध पातळी संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या महिनाभरापासून सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षावही सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातून होत आहे. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचा आरोपही भाजपानं केला आहे. भाजपाची सरकारविषयी अशी भूमिका असताना भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना कौतुक केलं आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सरकारच्या सध्याच्या कामाविषयी भाष्य केलं.

उद्धव ठाकरे आणि सरकारच्या कामाविषयी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या,”महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून मी त्यांना शुभेच्छा देते. उद्धव ठाकरे व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळत असल्याचं मला दिसतंय. टीका करणार नाही. तसं वाटलं तर सूचना करेल. तितका अधिकार मला त्यांच्याविषयी वाटतो. मुख्यमंत्री कुणीही असलं तरी त्याच्यावर आपला अधिकार असतो. त्यामुळे मला वाटत आतापर्यंत एक चांगलं काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांविषयी लोकांच्या मनात वेगळं व्यक्तिमत्व असतं. म्हणजे ती व्यक्ती अमूक असावी. त्याने ठराविक कपडे परिधान करावेत. विशिष्ट पद्धतीचं व्यक्तिमत्व असावं. पण, या सगळ्यांपेक्षा ते वेगळे दिसत आहेत. त्यांचा पेहराव किंवा सोशल मीडियावर स्वतः अॅक्टिव्ह नाहीत. सीएमओ (मुख्यमंत्री कार्यालय) अॅक्टिव्ह आहेत. हे थोडसं वेगळं दिसत, कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री स्वतः सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह होते. ते स्वतः ट्विट करायचे. त्यांचा सोशल मीडिया फार स्ट्राँग होता. उद्धव ठाकरे यांचा कल वेगळ्या पद्धतीनं दिसतो आहे. त्यामुळे मला वाटत नवीन असा पायंडा ते पाडू शकतात. आजच्या परिस्थिती माझ्या त्यांना पूर्ण शुभेच्छा आहेत,” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.