मतदार संघात पत्रक वाटून केंद्र सरकारची कामगिरी गावा गावात पोहचवा-आ.बबनराव लोणीकर

परतुर । वार्ताहर

जनतेने 2014 साली देशामध्ये परिवर्तन घडून आणत भाई नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखलील भारतीय जनता पार्टीच्या सरकारला प्रचंड बहुमतानी निवडून दिले होते जनतेने टाकलेल्या विश्‍वासाला सार्थ ठरवत केंद्र सरकारने दमदार कामगिरी करत देशाला योग्य दिशा दिली याच बळावर 2019साली  झालेल्या निवडणुकीमधे मोदी सरकारवर पुन्हा एकदा विश्‍वास दाखवत प्रचंड बहुमताने निवडून दिले  द्विवर्ष पुर्तीच्या निमित्ताने भाई नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कामगिरिचा लेखा जोखा व कोरोना संकटात जनसामान्याना दिलासा देणारे मोदी सरकारचे निर्णय पत्रकाच्या माध्यमातून मतदार संघातील घरा घरापर्यंत पोहचवण्याचे आवाहन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.  ते परतुर शहरामधे पत्रक वाटप शुभारंभा प्रसंगी पत्रकांसी बोलत होते पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातमधे देशाला भ्रष्टाचाराच्या दलदलीतुन बाहेर काढ़त अंत्योदयाच्या भावनेतून गरीबाचे आयुष सुखकर होण्यासाठी बँक खाते उघड़ने,  मोङ्गत गॅस कनेक्शन देने, मोङ्गत विज कनेक्शन देने,गरीबांसाठी घरे बांधून व शौचालय बांधून गोर गरीब जनतेचा सन्मान वाढवला असल्याचे आ.लोणीकर म्हणाले लागू करण्या सोबत च शेतकर्‍यांची वर्षानु वर्ष किमान आधारभूत किमतीची मागणी पूर्ण केली त्याच बरोबर सर्जिकल स्ट्राइक एअर स्ट्राइक च्या माध्यमातून भारताकडे वाकड्या नजरेने कुणीही बघू नये असा गर्भित इशारा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला असेही लोणीकर म्हणाले. 

सबका साथ, सबका विकास,सबका विश्‍वास हा मंत्र घेऊन देशाला सामजिक, आर्थिक, जागतिक स्तरावर वेगळ्या ऊँचीवर नेऊन ठेवण्याचे काम भाई नरेंद्र मोदी यांनी केले असे आ.लोणीकरांणी नमूद केले. वर्षानु वर्ष राष्ट्राचा विषय कलम 370 असो किंवा राम मंदिर निर्मानाचा मुद्दा असो त्याच बरोबर समाज व्यवस्थेत अडसर बनलेला तीन तलाखचा मुद्दा असो हे सर्व मुद्दे गत 2 वर्षामधे निकाली काढल्याचे आ. लोणीकर म्हणाले शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून देशातीली 9 कोटी 50 लाखा पेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या खात्यात 72 हजार कोटीचा निधी जमा केला त्याच बरोबर देशातील 15 कोटीच्या वर ग्रामीण भागातील घरामधे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या साठी जलजीवन मिशन सुरु करण्यात आले देशातील पशु धनाचे आरोग्य चांगले राहवे या साठी मोङ्गत लसी करनाचे मोठे अभियान चालु असल्याचे ही ते म्हणाले.  शेतकरी, शेतमजुर, छोटे दुकानदार, व असंघटित क्षेत्रातले कामगार अश्या सर्वांसाठी वयाच्या 60 वर्षा नंतर नियमित पणे दर महिन्याला 3000 हजार रुपये पेंसन मिळन्याची सुविधा सुरु करण्याचे काम मोदी सरकारने केले.  

कोरोना संकटाशी यशस्वी सामना

जगाच्या पातळीवर कोरोना महामारिने थैमान घातले असताना जगातील विशाल अर्थ व्यवस्था असलेल्या बड्या बड्या महाशक्ति कोलमडल्या मात्र भारताने कोरोना महमारीवर  व्यवस्थित नियोजन करुण कोरोनाला सिमित ठेवण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले.  आत्मनिर्भर भारत अभियानासाठी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहिर करुण शेतकरी, कामगार, लघु उद्योजक यांना दिलासा देण्याचे काम केले.  महाराष्ट्रातील सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी महाराष्ट्र राज्याच्या सत्तेवर असल्यालेले आघाडी सरकार कोरोना संकटाच्या काळात साङ्गशल अपयशी ठरले असून राज्यसरकारने राज्यातील जनतेला एक छदामाचीही मदत न करता भयावह परिस्थिति मधे वार्‍यावर सोडले असून निर्णय क्षमतेचा अभाव असलेले मुख्यमंत्री राज्याला संकटात सोडून ङ्गक्त शेरे बाजी करण्यात पटाइत असल्याची टिका आ.लोणीकर यांनी यावेळी केली  या वेळी भगवान मोरे, नगरसेवक सुधाकर सातोनकर,सभापती रंगनाथ येवले, डॉ.कोटेचा, संदीप बाहेकर  संपत टकले, सुबोध चव्हाण, प्रवीण सतोनकर, अंकुशराव नवल, सुधाकर बेरगुडे, संतोष हिवाळे, कृष्णा अरगडे,श्रीकांत उन्मुखी,किशोर क़द्रे,राजू ढवळे,शामसुंदर चित्तोड़ा, तुकाराम माठे,  नितिन जोगदंड,रामा घाडगे,अमोल हरजुळे, दत्ता एकिलवाले,मधुकर घनवट, यांची उपस्थिति होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.