तलवाडा ( प्रतिनिधी ) :- आपल्या भारत देशामध्ये कोरोनामुळे चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे कित्येक कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजारामुळे कधी नव्हे अशी कठीण परिस्थिती निर्माण झाली असून
या परिस्थितीत दिव्यांग मुले, निराधार व्यक्ती व पालावरील कुटुंब अशा एकूण १०२ कुटुंबांना सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत ज्ञानेश जनकल्याण सेवाभावी संस्था बीड संचलित कै.केशवरावजी धांडे मतिमंद निवासी विद्यालय तलवाडा ता.गेवराई जि.बीड या संस्थेचे सचिव - ज्ञानोबा गोतावळे यांनी किराणा सामान व अन्नधान्य वाटप करून संकटकाळात निराधारांना आधार दिल्यामुळे त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आहे.
दिव्यांग मुले, निराधार व्यक्ती व पाल ठोकून वास्तव्य करणारे आदिवासी कुटुंब यांना कोरोनाच्या संकटात मदतीचा हात देण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री श्री.धनंजयजी मुंडे साहेब,जिल्हा परिषद बीडचे जिल्हा समाज कल्याण अधिकरी श्री.एडके साहेब, वै.सा.का श्री.जाधवर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील ज्ञानेश जनकल्याण सेवाभावी संस्था बीड संचलित कै. केशवरावजी धांडे मतिमंद निवासी विद्यालय तलवाडा या संस्थेचे सचिव ज्ञानोबा गोतावळे यांनी स्वखर्चाने औरंगाबाद येथील पालावरील ७० कुटुंब, गेवराई येथे ०७ निराधार कुटुंबातील व्यक्ती व तलवाडा येथील २५ दिव्यांग व निराधार कुटुंबातील लोकांना किराणा सामान आणि अन्नधान्य घरोघरी जाऊन वाटप केले आहे. तलवाडयात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना सपोनि सुरेश उणवने, जमादार मारोती माने, पोलिस कर्मचारी सादिक तडवी, पं.स.चे माजी सदस्य - शेख खलीलभाई, संस्थेचे सचिव ज्ञानोबा गोतावळे, मुख्याध्यापक काळे सर, जगदंबा देवी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दिलीप नाटकर, डावकरे सर, लांडे सर, शेख सर, समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष - पत्रकार बापू गाडेकर, पत्रकार सुभाष शिंदे यांच्यासह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. कोरोना सारख्या महाभयंकर संकटात लाॅकडाऊन काळात पोटाची खळगी भरण्यासाठी अडचणीत सापडलेली दिव्यांग मुले, निराधार व्यक्ती व औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेल्या पालावरील कुटुंबातील लोकांना ज्ञानोबा गोतावळे यांनी मदतीचा हात देऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केल्यामुळे त्यांचे अनेकांनी कौतुक करून आभार व्यक्त केले आहेत.
Leave a comment