जालना । वार्ताहर
भारत-चीन सीमेवरील गवलान येथे चीनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना गुरूवारी (ता.18) रोजी रिपब्लिकन सेना जालना जिल्हाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. भारत-चीन सीमेवरील त्या घटनेचा निषेध करीत रिपब्लिकन सेनेच्या वतीने चीनच्या प्रधानमंत्र्याचा पुतळा जाळण्यात आला व चीनी वस्तूवर बहिष्कार टाकरण्यात आला.
यावेळी रिपब्लिकन सेना मराठवाडा अध्यक्ष सुधाकर निकाळजे, पश्चिम जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर, पूर्व जिल्हाध्यक्ष रोहिदास गंगातिवरे, जिल्हा महासचिव (एक्स आर्मी मेजर) चंद्रकांत खरात, जिल्हा संपर्क प्रमुख दिनेश आदमाने, जिल्हा संघटक मच्छिंद्र आप्पा खरात, जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष सुरेश वानखेडे, जालना ता. अध्यक्ष भिमराज खरात, सुरेश खरात, बबन साळवे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a comment