जालना । वार्ताहर
जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दि.19 जून शुक्रवार रोजी काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व ङ्गळवाटपाचा कार्यक्रम आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते जिल्हा सामान्य रूग्णालय येथे आयोजीत करण्यात आला आहे. सकाळी 11.30 वाजता आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे राहणार आहेत.
याप्रसंगी आजी-माजी प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी माजी जिल्हाध्यक्ष आदी मान्यवर नेते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, गटनेते गणेश राऊत, जिल्हा सरचिटणीस राम सावंत, आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, बदर चाऊस, विजय जर्हाड, सौ. विमलताई आगलावे, दिनकर घेवंदे, गुरूमितसिंह सेना, शेख शमसुु, संजय शेजुळ, दत्ताभाऊ शिंदे, अरूण घडलिंग, सौ. शितलताई तनपुरे, चंदाताई भांगडीया आदींनी केले आहे.
Leave a comment