ना.धनंजय मुंडेंचे परळी नगरपरिषदेला आदेश..
परळी (सोमवार पासुन : परळी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाण धरणातील पाणीसाठ्याचा विचार करून, पाण्याचा योग्य वापर व्हावा व पुढे जून - जुलै या महिन्यात पाऊसकाळ होईपर्यंत शहराला पिण्याचे पाणी पुरावे याची खबरदारी म्हणून सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी परळी नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ.सरोजनी काकू हलगे, उपाध्यक्ष शकील कुरेशी, गटनेते वाल्मीक अण्णा कराड, पाणी पुरवठा समितीच्या सभापती सौ. प्राजक्ता भाऊडया कराड व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरविंद मुंडे यांना दर पाच दिवसाला शहराला नियमित पाणी पुरवठा करावा अश्या सूचना ना.मुंडेंनी दिल्या आहेत.
परळी शहराला आता दर पाच दिवसांनी नियमित व सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येईल, याची परळीकरांना नोंद घ्यावी!
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरातील बोअरला नागरिकांनी गर्दी करू नये, नियमित पाण्याचे नियोजन नगर परिषदे मार्फत केले जाईल असे आवाहनही ना. धनंजय मुंडे यांनी शहरातील नागरिकांना केले आहे.
*परळी शहराला पाणी कमी पडू देणार नाही - सौ. प्राजक्ता भाऊडया कराड*
वाण धरणातील पाण्याच्या साठ्याचा विचार करता हे पाणी चांगला पाऊस पडेपर्यंत शहराला पुरावे याचे काटेकोर नियोजन करू, शरवासीयांनीही पाण्याचा अपव्यय टाळावा. ना.धनंजय मुंडे यांच्या आदेशाने आता दर पाच दिवसाला शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यात येईल, परळी शहराला आम्ही पाणी कमी पडू देणार नाही अशी ग्वाहीही यावेळी पाणी पुरवठा सभापती सौ. प्राजक्ता भाऊडया कराड यांनी दिली आहे.
Leave a comment