जालना । वार्ताहर
सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करता फिरणा-यांवर पोलीस प्रशासन व नगर परिषदेमार्फत दि. 17 जुन 2020 रोजी संयुक्तरीत्या एकुण 12 व्यक्तींवर कारवाई करत 4 हजार 800 रुपयांचा रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे पोलीस ठाणे सदर बाजार येथे एक गुन्हा दाखल करण्यात आला असुन 79 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोरोना व्हायरस (उजतखऊ - 19)ला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांबरोबरच सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. सर्व व्यापारी प्रतिष्ठाने व दुकानदार यांनी आपल्या दुकानात येणा-या ग्राहकामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याची दक्षता घ्यावी. दुकानासमोर विशिष्ट अंतरावर चुन्याने मार्कींग करुन घ्यावी. दुकानात कुठल्याही प्रकारे गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असेही पोलीस प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले आहे.
Leave a comment