कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
येथील तिरूपती कॉम्पलेक्स मधील अरिहंत ड्रेसेस अॅन्ड साडी सेंटरचे कपडा व्यापारी श्री वर्धमान धर्मराज खडके वय (44) यांनी ता.15 सोमवार रोजी सकाळी 10 वाजता दुकान बंद करून घरी आले. त्यांनी मोबाईल व दुकानाच्या चाव्या घरी ठेऊन आता येतो म्हणुन घरातुन निघून गेले...रात्री पर्यंत घरी न आल्याने बेपत्त झाल्याची पोलिसांत तक्रार ही देण्यात आली होती.असे पो.उप.नि.सचिन कापुरे यांनी सांगितले.
दुसर्या दिवशी मंगळवारी सायंकाळी 6 वाजता पाडोळी शिवारातील विहीरी जवळ त्यांची मोटरसायकल दिसून आली होती. परिसरातील नागरिकांनी विहिरीत पाहिले असता एक प्रेत तरंगत होते. बुधवारी सकाळी पोलीसा समक्ष विहिरीतून प्रेत बाहेर काढूले त्यांची ओळख पटली. त्यानंतर कुं.पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात श्वविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पच्छात तिनं भावांचे कुंटूब, पत्नी, एक मुलगा,एक मुलगी, असा मोठा परिवार आहे. घटनेचे कारण अद्याप कळाले नाही, पो.उप.नि.सचिन कापुरे हे पुढील तपास करिता आहे.
Leave a comment