तिर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी व परिसरात काल दि 16 रोजी जोरदार मृग नक्षत्राचा पावसा मुळे खापरदेव हिवरा खडकी नदीला तसेच भायगव्हाण नदी वरील पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे या नदीवरील जलयुक्त शिवार आची बंधारे एकाच पावसात ओवरफ्लो झाल्यामुळे ेतकर्यात मात्र समाधान व्यक्त केली जाते.
सविस्तर माहिती अशी की तीर्थपुरी मंडळात मृग नक्षत्राचा पहीलात जोरदार दमदार पाऊस मंगळवार व बुधवार रोजी झाल्यामुळे शेतकर्यांनी परिसरातील गावात खरिपाच्या पेरणीला लगबग सुरू केली असून अनेक ठिकाणी कापूस पिका ऐवजी सोयाबीन पेरणी वर जास्तीचा भर दिला असून यामुळे शेतकर्यांनी खरिपाच्या पेरणी मघा नक्षत्राच्या पावसामुळे शेतकरी मात्र सुखावला असून अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे ओढे-नाले खळखळ वाहू लागले शेतात पाणीच पाणी असल्यामुळे या पावसात ऊस पिकांना संजीवनीच मिळाली असून उसाची उत्पादनात मोठी वाढ होणार असल्याचे अनेकांनी सांगितले या मंडळात 42 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद समजते तसेच बुधवार रोजीही काही भागात जोरदार पाऊस पडल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहे असे वृत्त अनेक गावातून शेतकर्यांनी सांगितले, तसेच आंतरवाली टेंभी मंडळातही पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे पेरणीची लगबग वाढली असून कृषी सेवा केंद्रामध्ये शेतकर्यांची बी-बियाणे घेण्यास गर्दी केली जात असून अनेक ठिकाणी कृषी सेवा केंद्रामध्ये नामांकित सोयाबीन बियाणे चा तुटवडा असून यामुळे शेतकरी महामंडळाचे सोयाबीन व अंकुर यांची मागणी मोठ्या प्रमाणात शेतकर्यांमधून केली जात आहे पण या बियाण्याचा कृषी सेवा केंद्रातून तुटवडा व तीव्र टंचाई भासत आहे यामुळे कृषी विभागाने शेतकर्यांना नामांकित बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकर्यांमधून केली जात आहे.
Leave a comment