गेवराई:- जगात कोरोनो नावांच्या विषाणूने थैमान घातले आहे त्यामुळे गेवराई मतदार संघातील जनतेनेने घरात थांबुन आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी घरात प्रत्येक तासाला स्वच्छ हात धुणे तसेच सोशल डिस्टीगीगचा वापर करावा तसेच मास्काचा जास्तीत जास्त वापर करावा तसेच वापरलेला मास्क दिवसातून दोन वेळा तरी धुवून वापरावा तसेच विनाकारण बाहेर पडू नये असे आवहान आ लक्ष्मण पवार यांनी केले आहे येथील बाळनाथ ग्रामीण विकास महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गेवराई शहरामध्ये एकूण 15000 हजार मास्कचे वाटप करण्यात येणार असून दि.10 एप्रिल रोजी आ.लक्ष्मण पवार व स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते संजय नगर भागापासून सुरुवात करण्यात आली.
आ. लक्ष्मण पवार यांच्या हस्ते हा उपक्रम सुरू करण्यात आला असून त्यांनी प्राथमिक स्वरूपात संजय नगर येथील अनेक नागरिकांच्या घरोघरी जाऊन नागरिकांना हे मास्कचे वाटप केले. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, घराच्या बाहेर पडू नका, चौकाचौकात गर्दी करू नका, स्वतःची काळजी घ्या असे आवाहन करत बाळनाथ ग्रामीण विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगत त्यांच्या कार्याची कौतूक केले. यावेळी नायब तहसिलदार अशोक भंडारे,पोलीस निरिक्षक पुरुषोतम चोबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम,अधिक्षक डॉ.राजेश शिंदे, मुख्याधिकारी भागवत बिघोत, नगराध्यक्ष सुशिल जंवजाळ,गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब गिरी, बाळनाथ ग्रामीण विकास महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दशरथ पोपळे,सचिव अनिलकुमार शिंदे,उपाध्यक्ष राखमाजी चौधरी, संचालक शहादेव करपे,पत्रकार गणेश क्षीरसागर, जुनेद बागवान, सोमनाथ मोटे,नगरसेवक काशीनाथ पवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती. हे मास्क बाळनाथ ग्रामीण विकास महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने बनवलेले असून अत्यंत दर्जेदार आहेत. तर उद्यापासून गेवराई शहरातील रोज एका वार्डात याचे वाटप करण्यात येणार असून याचा सर्व नागरिकांनी उपयोग करून आपली काळजी घ्यावी असे अवाहन बाळनाथ ग्रामीण विकास महिला सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दशरथ पोपळे यांनी केले आहे.
Leave a comment