गेवराई -मधुकर तौर गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील दहा कुंटूबातील ऊसतोड कामगार पुणे जिल्ह्यात कारखान्यांवर कामगार म्हणून काम करत होते.मागिल पंधरा दिवसापासून लाॅकडाऊन मुळे हे कामगार कसे बसे आपल्या गावाकडे येत आसताना त्यांना गेवराई व शिरुर तालुक्यातील सिमेवर रोखण्यात आले. याळी येथील कामगारांनी आ.पवार यांना फोन केला असता त्यांनी तात्काळ गेवराई प्रशासनाचे नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांना सांगितले जाधवर यांनी शिरूर तहसील कार्यालयाशी संपर्क करुण त्या लोकांना सिरसदेवी या त्यांच्या गावी पाठवले.
गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील दहा कुंटूबातील उसतोड कामगार व दहा बैल जोड्या सोबत पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर कारखान्यावर उसतोडणीसाठी गेले होते.कोरोना वायरसमुळे वीस दिवसापासून हा कारखाना बंद करण्यात आला आहे.आलेल्या कामगारांची जिल्हा प्रवेश बंदीमुळे या कारखान्याने सोय करणे आवश्यक होते.माञ या कारखान्याने या कामगारांना वा-यावर सोडत आप आपल्या गावी जाण्याचे सांगितले.आपल्या गावी येण्यासाठी या कामगारांनी आपल्या मुक्या जनावरांसह दहा दिवसापासून पायपिट करत आपला बीड जिल्हा गाठला.आपल्याच बीड जिल्ह्यातील शिरुर कासार या तालुक्यातील मातोरी चेक पोस्ट वर चौकशी साठी त्यांना रोखण्यात आले.वास्तविक या कामगारां पासून कोरोना या संसर्गजन्य रोगा बाबत कसालाच फैलाव नसल्याचे समोर आले.
या दहा कुंटूबातील उसतोड कामगारांची होम क्वारांटाईन म्हणून शिरुर कासार प्रशासनाने तयारी दर्शवली माञ या लोकांचा व कोरोनाग्रस्त लोकांशी कसल्याही प्रकारे संपर्क आला नसल्याचे प्रथम दर्शनी दिसुन आले.तसेच होम क्वारांटाईन म्हणून शिरुर तालुक्यात या लोकांना ठेवल्यास प्रशासन कामगारांना दोन वेळेस जेवन देईल हे निश्चित होते.माञ त्यांच्या सोबत आसलेल्या दहा बैल जोड्या व इतर जनावरांना दररोज चारा व पाणी कसे देणार असा प्रश्न उपस्थित झाला.
याबाबत गेवराईचे आ.लक्ष्मण पवार यांनी शिरुर कासार येथील तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून आपले प्रशासन गेवराई तालुक्यातील कामगारांची जेवणाची व राहण्यासाठी सोय करेल.माञ त्यांच्या सोबत आसलेल्या दहा बैल जोड्यांचा चारा पाण्याचे काय असा प्रश्न उपस्थित केला.यावर शिरुर प्रशासनाने गेवराईचे तहसीलदार धोंडिबा गायकवाड व नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्याशी संपर्क साधून या लोकांची माहिती घेतली.एक प्रकारे त्यांना आपल्या गावच्या शेतातच सिरसदेवी येथे राहण्यासाठी गेवराई प्रशासनाने माणुसकीच्या माध्यमातून परवानगी मागितली.व तसे ते बाहेर जिल्ह्यातून आल्यामुळे आम्ही त्या कामगारांना शेतातच काही दिवस राहण्याचा सल्ला देवून त्यांची वेळोवेळी तपासणी करणार असल्याचे गेवराई प्रशासनाने सांगितले,आमदार अड़ लक्ष्मण पवार यांच्या तत्परतेने या उसतोड़ कामगाराना आपल्या गावी जाण्याचे योग आलेत.
Leave a comment