चौदा रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज-जिल्हा शल्य चिकित्सक

जालना । वार्ताहर

जिल्हा सामान्य रुग्णालयातुन यावलपिंप्री  ता. घनसावंगी येथील -2, काद्राबाद जालना येथील 1, बालाजीगल्ली आफसा मस्जिद जालना -1, राजेगाव ता. घनसावंगी-2, पांगरा ता. घनसावंगी - 3, पारडगाव ता. घनसावंगी- 1, नानसी ता.मंठा- 2, आकणी ता.मंठा -2 असे एकुण 14 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दि. 16 जुन 2020 जालना शहरातील गुडलागल्ली परिसरातील 4, संभाजीनगर जालना - 1, काद्राबाद  - 3, खरपुडी ता. जालना 1, राज्य राखीव पोलीस दलातील - 02 जवान, बालाजीनगर, जालना येथील 01, गोलमस्जिद, काद्राबाद जालना येथील 01, जाफ्राबाद शहरातील नगर पंचायत परिसरातील -1 व आंबेडकरनगर परिसरातील - 1, भोकरदन शहरातील - 3 अशा एकुण 18 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.  

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण - 3466 असुन सध्या रुग्णालयात -83, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1298, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-73, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -4041, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने - 18 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -309, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -3716, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-399, एकुण प्रलंबित नमुने -12, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1207. 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-23, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती -1108, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-22, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-441, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-12,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 83, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -133, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-14, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -185,  सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 108, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या -08, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 8643, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 08 एवढी आहे.  कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण -441 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये : संत रामदास वसतीगृह जालना -39,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, जालना-23,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह,जालना -36,शासकीय मुलींचे वसतीगृह मोतीबाग जालना-38, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -191,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद- 08, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -08, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड - 42, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे -02, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -23, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -14, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-11, डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र.02 भोकरदन -06 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 169 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 808 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 825 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख 33 हजार 430 असा एकुण 3 लाख 60 हजार 238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.