अंबाजोगाई (प्रतिनिधी) राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.रक्तदान करा या आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे व महसूलमंञी तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने शुक्रवार,दिनांक 10 एप्रिल रोजी येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या ब्लड बँकेत दुस-या टप्प्यात आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह 50 जणांनी रक्तदान केले.पुढील काही दिवसांत रूग्णालयाच्या आवश्यकतेनुसार आणि
टप्प्याटप्प्याने काँग्रेसचे कार्यकर्ते हे रक्तदान करतील अशी माहिती आयोजक बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली सध्या अंबाजोगाईसह राज्यात लॉकडाऊनची परस्थिती आहे.तर दुसरीकडे रक्ताचाही तुटवडा ही मोठ्या प्रमाणात जाणवतोय.ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार जिल्हा काँग्रेसने आज पुन्हा शुक्रवार,दिनांक 10 एप्रिल रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, महादेव आदमाने,सुनिल व्यवहारे,धम्मा सरवदे,राणा चव्हाण,विजय रापतवार,
सिमाताई लालासाहेब जाधव हे उपस्थित होते.तर या शिबिरात नगरसेविका सौ.बबीता महादेव आदमाने,नगरसेविका सौ. संगीता सुनिल व्यवहारे, वैजयंती आनंद टाकळकर, सविता विनायक मुंजे,वर्षा चंद्रकांत तोडकर,सविता विश्वंभर जाधव,रेखा संतराम सातपुते,वैशाली संजय व्यवहारे,संगीता बाबासाहेब कराड,वृषाली बाबासाहेब वारकरी,सुवर्णा सुरेश बुरांडे,ज्योती महारूद्र व्यवहारे,शितल कैलास व्यवहारे या महिलांसह रंजन परसूवाले,शेख जमीर शेख नूर,रहीम गवळी, मजहर गवळी,फिरोज रेगीवाले,मुक्तार परसूवाले, पंकज रापतवार,बाबासाहेब वारकरी,योगेश मोदी, रमजान परसूवाले,मोहम्मद हुसेन गवळी,जावेद रेगीवाले,विनायक मुंजे,भरत पावडे,दिनेश वेदपाठक, अशोक दहिभाते,शहाजी रणदिवे,अशोक इंगळे, विक्रम चौधरी,परमेश्वर रणदिवे,पठाण,प्रवीण माने,जावेद गवळी,सुनील वारकरी,फैजल पठाण, विशाल चव्हाण,युनुस गवळी,माजेद पठाण, अस्लम पठाण,फारूख मुन्नीवाले,शेख शरीफ, भालचंद्र पिसाळ,संजय पवार,महेबूब गवळी, संघपाल चिमणे,जावेद छोटू गवळी आदी 13 महिलांसह एकूण 50 जणांनी रक्तदान केले.रक्तदान शिबिर प्रसंगी प्रभारी अधिकारी डॉ.विनय नाळपे,डॉ.केदार हे उपस्थित होते.तर शिबिराच्या यशस्वितेसाठी शशिकांत पारखे,तंत्रज्ञ सय्यद मुश्ताक,शेख अन्वर,परिचर श्रीराम कुंजटवाड यांचे सहकार्य लाभले. रक्तदात्यांना वेळ ठरवून दिल्याने रक्तदान शिबीराच्या ठिकाणी गर्दी झाली नाही.आयोजकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करीत प्रत्येकांमध्ये किमान एक मीटर इतके सुरक्षित अंतर ठेवून सॅनिटायझर आणि मास्कची सुविधा उपलब्ध करून दिली.
रक्तदान हे सामाजिक भान असलेलं महान कार्य..!-राजकिशोर मोदी*
=================
येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या ब्लड बँकेत
रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.तसेच राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे व महसूलमंञी तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांनी आपल्या सर्वांना काही दिवसांपूर्वीच आवाहन केले आहे.त्यामुळे बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज शुक्रवार,दिनांक 10 एप्रिल रोजी रक्तदान शिबिर आयोजित केलं होते.त्यात 13 महिला भगिनींसह 50 जणांनी रक्तदान केले.त्या सर्व रक्तदात्यांचे आभार. पुढील काळात रूग्णालयाच्या आवश्यकतेनुसार आणि टप्प्याटप्प्याने सुमारे 500 काँग्रेस कार्यकर्ते रक्तदान करतील.रक्तदान केल्याने संसर्ग होणार नाही किंवा वीकनेस येणार नाही. रक्ताचा कमी झालेला साठा पुन्हा भरून काढावा. सोशल डिस्टन्स राखून रक्तदान सुरू ठेवावं,फार गर्दी करू नये.रक्तदान हे सामाजिक भान असलेलं कार्य आहे आणि गरजेची बाब आहे.सध्याची ही मागणी आहे.त्यामुळे सोशल डिस्टन्स राखून रक्तदान सुरू ठेवावं असे आवाहन राजकिशोर मोदी यांनी यावेळी केले.
Leave a comment