दैनिक लोकप्रश्न बातमीच्या इफेक्ट
तीर्थपुरी दुकानांच्या तपासणीत सात कृषी सेवा केंद्रांना नोटिसा बजावल्या
तिर्थपुरी । सर्जेराव गिरे
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील कृषी सेवा केंद्रात विर्या खताच्या लिंकिंग च्या नावाखाली या मधल्या दैनिक लोकप्रश्न बातमी दि. 13 रोजी अंकात प्रसिद्ध होतास जालना येथील जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब थोरात जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक एस.डी.गरांडे यांनी तीर्थपुरी येथील सात कृषी सेवा केंद्रांना भेटी देऊन तपासणी केली असता या तपासणीत या दुकानात मधील दर्श की भागात भाव फलक न लावणे न ठेवणे विक्री व या स्टॉक रजिस्टर नोंदी न ठेवणे ग्राहकांना खते बियाणे विक्री पावतीवर ग्राहकांच्या दुकानात बोर्ड फलकावर लायसन परवाना विक्री खतावणी न ठेवणे स्वाक्षरी न घेणे संबंधित खताच्या गोदामावर शेतकर्यांना नामांकित खताची स्टॉक असताना कृत्रिम टंचाई दाखवून शासन मान्य नसलेल्या भूसुधारक खताची ग्राहकांच्या माथी मारून विक्री करणे अशा शेतकर्यांच्या आर्थिक लूट कृषी सेवा केंद्र मधून केल्या जात असल्याच्या तपासणी व पाहणे मधून अनेक तुरटी गंभीर बाबी समोर जिल्हा कृषी अधिकारी यांच्या दिसून आल्या.
तसेच युरिया खत शेतकर्यांनी मागणी केल्यास त्यावर लिंकिंग दुसर्या खताची जोड घेतल्याशिवाय विक्री न करणे अशा गंभीर बाबी तपासणी वेळी दिसून आल्यामुळे या जिल्हा कृषी अधिकारी यांनी तीर्थपुरी येथील काल शनिवार रोजी तीन ते चार तास तपासणी वेळी गुरुकृपा ग्रो कृषी सेवा केंद्र अमोल कृषी सेवा केंद्र बालाजी ट्रेडिंग ऍग्रो केंद्र गीता कृषी सेवा केंद्र अभयराज कृषी सेवा केंद्र तसेच प्रगत कृषी सेवा केंद्र अन्य एका अशा सात कृषी सेवा केंद्रांना जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी नोटिसा बजावल्या असून यामुळे या कृषी सेवा केंद्राच्या तपासणीमुळे या केंद्रावर शेतकर्यांची लूट अडवणूक करणार्या दुकानदारावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Leave a comment