बदनापूर । वार्ताहर

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊनमुळे रस्त्यावर वाहतूक कमी असल्याचा फायदा टोलवेज कंपनीने घेऊन मान्सूनपूर्व दुरुस्ती न केल्यामुळे जालना-औरंगाबाद महामार्गावर मान्सूनच्या पहिल्याच पावसाने डांबराचा थर निघून जाऊन मोठ मोठे खोल खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत असून लॉकडाउननंतर प्रवाशांची लगबग असताना वाहतुकीचा जागोजागी खोळंबा होत असतानाच मोटारसायकल व छोटया वाहनांना खडडयांचा अंदाज येत नसल्यामुळे छोटे - मोठे अपघात होत आहेत.

कोरोना रोगाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले होते. त्या दरम्यान महामार्गावर अतिशय कमी वाहतूक होत होती. त्याचप्रमाणे जानेवारीनंतर या रस्त्याचे मान्सूनपूर्व कामे करून मजबुतीकरण, अस्तरीकरण करण्यात येते सभांजीनगर - जालना या महामार्गाचा देखभाल व दुरुस्ती टोलवेज कंपनीकडे असून त्या कंपनीने उन्हाळयात करण्यात येणारे मान्सूनपूर्व कामे न करता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या महामार्गाच्या दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष केले. या  दुर्लक्षामुळे या पहिल्याच पावसात या रस्त्याची दूरवस्था झालेली असून ठिकठिकाणी पाणी साचून खडडे पडले. या खडडयांचा अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत तर अनेक चारचाकी गाडयांचे चेंबर फुटून नुकसान होत आहे. जालना-औरंगाबाद टोलवेज कंपनी जालना ते संभाजीनगर या चार पदरी रस्त्यावर दोन ठिकाणी टोल जमा करते. असे असतानाही या रस्त्याचे मजबुतीकरण नसल्याचेच परतीच्या पावसाने दाखवून दिले आहे. या संपूर्ण महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या चारही पदरावरील रस्त्यावर पावसाने दोन ते चार फूट खोल खोल गडडे पडलेले आहेत. त्यातच ढगाळ वातावरण व सुरू असलेल्या रिमझिम पावसाचे पाणी त्या गडडयात तुंबत असल्यामुळे मोटारसायकलस्वार त्यात जाऊन घसरून पडण्याच्या घटना घडत असतानाच चार चाकी वाहनांचेही ऑईल चेंबर फुटण्याच्या घटना घडत आहेत. खडडयामुळे वाहतुकीचाही खोळंबा होण्याची शक्यता आहे. ही टोलवेज कंपनी खडडे पडल्यानंतर पडलेल्या खडडयात खडी व मुरुमाचा भरणा करून खडउे बुजावण्याचा प्रयत्न करते परंतु रिमझीम पावसामुळे या मुरुमामुळे गडडयाच्या बाहेर चिखल होऊन त्याचाही वाहनधारकांना त्रासच होतो. संभाजीनगर ते जालना रस्त्यावर डांबराचा थर मारुन संपूर्ण रस्त्याचे नुतनीकरण करून वाहनधारकांचा त्रास थांबवण्याची मागणी होत आहे. मागच्या वर्षीही परतीच्या पावसानंतर या महामार्गावर प्रचंड खडडे पडून दूरवस्था झालेली होती. परंतु तेव्हाही टोलवेज कंपनीने थातूर मातूर काम केल्यामुळे या वर्षी पहिल्याच पावसाने या रस्त्यावर खडयाचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. या वर्षीच्या पहिल्याच पावसात या महामार्गावर जाणार्‍यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच थोडाशा पावसातच संपूर्ण रस्ता उखडल्यामुळे या कामाच्या क्वालिटीविषयीच संशय व्यक्त होत असून या रस्त्याचे त्वरित मजबुतीकरण व अस्तरीकरण करण्याची मागणी होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.