जाङ्ग्राबाद । वार्ताहर
जाङ्ग्राबाद ते देऊळगावराजा रोडवरील लालदेवपाटी येथे विदर्भ व मराठवाडाच्या सिमा चेकपोस्टवर पोलीसांकडून वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या रोगाच्या संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे यामध्ये ज्या ज्या जिल्हात कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी जास्त आहे असे जिल्हे रेड झोन, ग्रीन झोन, आँरेंजझोन अशी वर्गवारी करण्यात येऊन ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे कडक निर्बंध घातले होते. जनते सुद्धा या नियमांचे घरी बसुन काटेकोरपणे पालन केले. त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊनमध्ये थोडीङ्गार शिथीलता देवुन सुद्धा अंतर जिल्हा बंदी कायम आहे.
असे असतांना सुद्धा काही लोक विणाकारण शेजारील जिल्ह्य़ातील देऊळगावराजा येथे येजाय करीत असतात. काही जणांनाकडे वाहन चालविण्याचा परवाना सुद्धा नाही. अशा विणाकारण ङ्गिरणार्या विरुद्ध दोन जिल्हा चे पोलीस आपले रात्रंदिवस कर्तव्य बजावत असुन मोकाट ङ्गिरणार्या विरुद्ध दोनशे रुपये दंडात्मक कार्रवाई केली जात असल्याचे या सिमा चेकपोस्टवरील पोलीस कर्मचारी जनार्दन भापकर, पो.कॉ.मुळे यांनी सांगितले.
Leave a comment