गेवराईमध्ये सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत जिवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली असून या वेळेदरम्यान शेतकरी आपला भाजिपाला विकण्यासाठी शहराकडे येतात तर काही शेतकरी हे आपल्या शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन डिझेल टाकण्यासाठी येतात परंतु या शेतकर्यांना ना पेट्रोल दिले जाते ना डिझेल मात्र पंप चालकाकडुन व तेथील कर्मचार्यांकडुन दंडुके मारण्याची भाषा केली जाते.
दुसरीकडे याच गेवराई मधील झमझम पेट्रोल पंपावर दोन लिटर पेट्रोलची अवैध विक्री केली म्हणून तहसीलदार यांनी झमझम पंप सिल केला परंतु याच शहरातील राजवीर पेट्रोल पंपावर चक्क संचारबंदी शिथिल झालेल्या वेळेत शेतकर्यांना पंपाचालकाकडुन दंडुके मारण्याची भाषा करण्यात आली.आता या पेट्रोल पंपावर प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Leave a comment