आष्टी । वार्ताहर

कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन आष्टी येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे आ.बाळासाहेब आजबे, माजी आ.भीमराव धोंडे, माजी आ.साहेबराव दरेकर, युवा नेते जयदत्त धस, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, नायब तहसिलदार शारदा दळवी, रा.काँ.चे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, सभापती बद्रीनाथ जगताप, काकासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सार्वजनिक जयंतीनिमित्त  सोशल डिस्टन्स नियम पाळत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली.

बीड जि.प.माजी अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सध्या पध्दतीने जयंती साजरी करण्यात आली.आष्टी येथे राजमाता पुण्श्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते परंतु यावर्षी कोरोना व्हायरसचे भयंकर संकट आल्याने आष्टी येथील पुण्श्‍लोक अहिल्यादेवी होळकर चौकातराजकीय नेते ,पदाधिका-यांच्या उपस्थितीमध्ये जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे, राजाभाऊ दरेकर, अ‍ॅड.पंढरीनाथ पारखे, उपसभापती अशोक ढवण, गंगा खेडकर, पत्रकार उत्तम बोडखे, शरद तळेकर, गोवर्धन जाधव, अंकुश खोटे (फौजी), केंद्रप्रमुख ञिंबक दिंडे, शिवाजी पांढरे, बाळासाहेब महाडिक, संतोष दाणी, अरुण खुळपे, दिपक पानसांडे, हनुमंत भिसे, भाऊसाहेब ढोरमारे आदि उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.