केज । वार्ताहर
लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांची जयंती आपल्या भागात सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्याचे आवाहन माजप नेत्या पंकजाताई मुंडे व जिल्ह्याच्याखा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केले असून या आवाहनाला प्रतिसाद देत विडा जि.प.गटातील तब्बल 300 गरजू कुटुंबांना मोफत किराणा कीटचे वाटप करण्याचा निर्णय जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांनी घेतला असून 3 जून रोजी 300 गरजू कुटुंबांना किराणा कीटचे वाटप करण्यात येणार आहे.
सध्या देशभरासह महाराष्ट्राभर कोरोनोने थैमान घातल्याने शासनाकडून संचारबंदी सारख्या कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात आल्याने हातावर पोट असलेल्या अनेक मजूरांची परवड झाली असून याच पार्श्वभूमीवर म्हणजेच 3 जून रोजी लोकनेते स्व.गोपिनाथराजी मुंडे यांच्या जयंतीदिनी गरजूंना मदत व्हावी या उद्देशाने पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांनी गोपिनाथ गडावर गर्दी करण्यापेक्षा आपल्या भागातील अडचणीत असलेल्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या भागातील आत्महत्या ग्रस्त, निराधार, गरजू कुटुंबांना मदत व्हावी यासाठी विडा जिल्हा परिषद गटाचे कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी विडा जि.प.गटातील 300 गरजू कुटुंबांना किराणा कीटचे वाटप करण्याचा निर्णय घेतला असून 3 जून रोजी किराणा कीटचे वाटप करण्यात येणार आहे.
Leave a comment