बीड । वार्ताहर
कोरानाने जगभर थैमान घातले आसुन यावर ठोस असा विलाज आणखी उपलब्ध झाला नाही परंतु या महामारी विरोधात होमिओपॅथी औषधाने लढाई लढता येते हे सिद्ध झालेले आहे. यास केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने होनिओपॅथीचे आर्सेनिक अल्बम 30 वापरन्यास सांगीतले आहे. हे औषध कोरोना विरुद्ध रोग प्रतिकार शक्ती वाढवते व कोरोना पासुन बचाव करते म्हणुन हे औषध राज्य सरकारने ग्रामीण भागात मोफत वाटप करन्या करिता थेट ग्रामपंचायतला आनुदान वितरीत करावे आसे मत भाजपाचे युवा नेते संभाजी सुर्वे यांनी मांडले आहे.
भाजप नेत्या पंकजाताई मुंडे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते संभाजी सुर्वे यांनी कोरोना विरोधात लढन्यास मदत करणारे अर्सेनिक अलबम 30 हे औषध भाळवणी येथील 100 कुटुंबाला स्वखर्चातुन मोफत वाटप केले या वेळी गावकर्यांनी त्यांचे अभार व्यक्त केले व यावेळी पत्रकाद्वारे सुर्वे यांनी सरकारला विनंती केली आहे की, ग्रामीण भागातील लोकांची कोरोना विरुद्ध रोग प्रतिकार शक्ती वाढवायची आसेल तर सरसकट आर्सेनिक अलबम 30 हे औषद मोफत देन्या करीता सरकारने थेट ग्रांमपंचायतला आनुदान उपलब्ध करुन द्यावे व यामध्ये प्रतेक ग्रामपंचायतला एक होमीओ पॅथीचे डॉक्टर देऊन त्यांच्या देखरेखीत हे औषध देण्याची व्यवस्था करावी.
Leave a comment