केज । वार्ताहर
गावात ज्यांनी दारू बंदी करायची जबाबदारी आहे अशा सरपंच महोदयांनी स्वतः दारू पिवून जिल्हाधिकारीयांच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी केज तालुक्यातील एका सरपंचावरच गुन्हा दाखल झाला आहे.
गावात दारू बंदी, गुटखा बंदी आणि नशबंदी राबवून गाव तंबाखू मुक्त व नशबंदी सारखी विविध योजना राबवून गावाचा विकास करावा अशी अपेक्षा गावच्या सरपंचां कडून असते. तसेच जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस प्रशासन यांच्या सूचना व आदेश यांचे गाव पातळीवर पर्यंत राबवून कार्यवाही करण्याचे काम करावे लागते. मात्र केज तालुक्यातील बोबडेवाडी येथील संतोष क्षीरसागर या सरपंच महोदयांनी शनिवारी (दि.30) सायंकाळी 7:30 वाजता सुमारास बोबडेवाडी येथे महादेव मंदीराकडे जाणारा रोडवर कोरोना विषाणू रोगाचा संक्रमणाचा फैलाव होवू शकतो हे माहीत असताना देखील विनाकारण दारुच्या नशेमध्ये रोडवर फिरुन जिल्हा जिल्हा दंडाधिकारी यांनी जारी केलेला संचारबदीचे उल्लंघन केले. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळविताच पोहेकॉ.दिनकर पुरीयांच्या फिर्यादीवरून केज ठाण्यात भा.दं.वि. कलम 188, 369, 270 सह महाराष्ट्र पोलीस कायदा 17 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायदा 2005 चे कलम 51(ब) व महाराष्ट्र कोवीड -19 उपाय योजना 2020 चे 11 कलम व 85 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस हेडकॉन्स्टेबल धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.दरम्यान गावच्या प्रमुखांनी अशा प्रकारे वर्तन करणे हे अयोग्य असून नागरिकांच्या तक्रारी नुसार व वरिष्ठांच्या आदेशांचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असे पो.नि. प्रदिप त्रिभूवन यांनी सांगीतले.
Leave a comment