पीडित साडेसात महिन्यांची गर्भवती
बीड । वार्ताहर
लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घाटसावळी (ता.बीड) येथे शनिवारी (दि.30) उघडकीस आली. पीडिता साडेसात महिन्यांची गर्भवती असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान आरोपी बालाजी सावंत यास रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 5 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलीसांच्या माहितीनुसार, बालाजी सखाराम कदम (27, रा.घाटसावळी) असे आरोपीचे नाव आहे. पीडित 20 वर्षीय तरूणीला बालाजी कदमने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. दरम्यानच्या काळात पीडितेला गर्भधारणा झाली. ती सध्या साडेसात महिन्यांची गर्भवती आहे. पीडितेने शनिवारी पिंपळनेर पोलिसांत धाव घेत वरील आशयाची फिर्याद दिली. त्यावरून बालाजी कदम विरोधात बलात्कार, अट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यास गावातून अटक केली. सहायक निरीक्षक शरद भुतेकर, उपनिरीक्षक साई पवार, ज्ञानेश्वर सानप, पोहेकॉ बालासाहेब सुरवसे, अजय जाधव, राम खेत्रे यांनी ही कारवाई केली. उपअधीक्षक भास्करराव सावंत अधिक तपास करत आहेत.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment