बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातून रविवारी (दि.31) 38 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. यातील 36 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर 2 जणांचे रिपोर्ट अनिर्णयीत आहेत.
जिल्ह्यातील मागील तीन दिवसांचे स्वॅब अहवाल पाहिले तर कोरोना बाधीतांची संख्या कमी होताना दिसत आहे. शुक्रवारी (दि.29) तपासणीला पाठवलेल्या 118 पैकी 116 अहवाल निगेटिव्ह आले होते तर 1 अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. अन्य 1 अहवाल अनिर्णयीत आहे. त्यानंतर शनिवारी (दि.30) सकाळी जिल्ह्यातून एकुण 38 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते. पैकी तब्बल 37 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह तर डोमरी (ता.पाटोदा) येथील 38 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सध्या डोमरी गावात पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यानंतर रविवारी सकाळी जिल्ह्यातून 38 स्वॅब तपासणीला गेले होते. यातील तब्बल 36 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत त्यामुळे बीड जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान 2 जणांचे रिपोर्ट अनिर्णयीत आहेत.
Leave a comment