शासनाकडून पंधरा दिवसाची मुदतवाढ

आष्टी / प्रतिनिधी

 महाराष्ट्र शासनाच्या सहकार आणि पणन विभागाच्या वतीने शासकीय हमीभाव प्रमाणे हरभरा खरेदी केला जात आहे. ऑनलाइन नोंदणीची 31 मे ही शेवटची तारीख होती परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता 14 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे .आष्टी तालुक्यातील शासकीय खरेदी केंद्रामध्ये शेतकऱ्यांनी 14 जून पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाइन नोंदणी करावी असे आवाहन आमदार बाळासाहेब आजबे यांनी मतदार संघातील शेतकऱ्यांना केले आहे . 

    महाराष्ट्र शासनाच्या सहकार आणि पणन विभागाच्या वतीने शासकीय हमीभाव प्रमाणे हरभरा खरेदी केंद्र ठिक ठिकाणी सुरू केले आहेत यामध्ये 31 मे ही शेवटची तारीख असतानाही ती आता वाढवून 14 जून पर्यंत करण्यात आली आहे, ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा हरभरा केंद्रावर घेतला जाणार आहे,जे शेतकरी अद्याप पर्यंत ऑनलाइन नोंदणी पासून वंचित राहिले आहेत त्यांनी त्वरित ऑनलाइन नोंदणी करून आपला हरभरा शिराळा येथील भैरवनाथ सर्वसाधारण सहकारी संस्था मर्यादित सांगवी पाटण अंतर्गत सुरू असलेल्या हरभरा खरेदी केंद्रावर किंवा इतर केंद्रावरआणून घालावा. कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना ऑनलाईन करण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या याचा शासनाने विचार करून हरभरा खरेदी करण्याची मुदत पंधरा दिवसांनी वाढवून दिली आहे त्यामुळे याचा फायदा राहिलेल्या शेतकऱ्यांनी घ्यावा व आपला हरभरा लवकरात लवकर शासकीय खरेदी केंद्रावर आणावा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर हरभरा पिकाचे उत्पन्न झाले असल्यामुळे शासकीय खरेदी केंद्रावर ही मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे तरीसुद्धा काही प्रमाणात शेतकऱ्यांकडे हरभरा शिल्लक असून तो शासकीय हमीभाव केंद्रावरच आणावा असे आवाहन आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.