वन नेशन, वन रेशन योजना लागू होणार
बस सेवा, रेल्वेसेवा सुरू होणार
गॅस सिलेंडरसह पेट्रोलचे दर वाढणार
बीड । वार्ताहर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर देशामध्ये वेगवेगळ्या योजना कार्यारित केल्या असुन उद्यापासून toदेशात सारे काही बदलले जाणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे वन नेशन, वन रेशन ही योजना लागू करण्यात येणार आहे. यामुळे सर्वात महत्वाच्या अशा मजुरांच्या त्यातही स्थलांतरीत मजुरांचा मोठा प्रश्न सुटणार आहे. कुठल्याही रेशनकार्डधारकाला कुठेही धान्य या योजनेमुळे मिळणार आहे.त्याचबरोबर राज्यात घरगुती गॅस सिलेंडरचे भावही वाढण्याची शक्यता असुन राज्या-राज्यात पेट्रोल दरवाढीचा भडका होणार आहे.
मोदी सरकारच्या या योजनेचा 67 कोटी लोकांना फायदा होईल. सध्या ज्या जिल्ह्यात रेशनकार्ड बनलेले आहे, त्याच जिल्ह्यात तुम्हाला रेशन मिळते. तुम्ही जिल्हा बदलल्यास तुम्हाला त्याचा लाभ मिळत नाही. यामुळे स्वस्त धान्यही इतर जिल्ह्यात गेल्यावर आपल्याला जास्तीचे पैसे मोजून खरेदी करावे लागते. एक देश, रेशन कार्ड अस्तित्वात आल्यानंतर, दारिद्र्यरेषेखालील लोक कोणत्याही जिल्ह्यात किंवा राज्यात रेशन कार्डाच्या माध्यमातून धान्य मिळवू शकतात.
रेशनकार्ड धारकांना तीन रुपये प्रतिकिलो दराने पाच किलो तांदूळ आणि दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू मिळणार आहे. स्थानिक भाषा आणि हिंदी किंवा इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये हे कार्ड दिले जाईल. रेशन कार्डला आधारशी जोडण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. यासंदर्भात केंद्रीय अन्न मंत्रालयाने असे म्हटले आहे की, रेशनकार्ड धारकांना आधारशी जोडले गेलेले नसले तरी रेशन मिळणार आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना असे निर्देश देण्यात आले आहेत की कोणत्याही लाभार्थ्याला त्यांच्या वाटाचे रेशन नाकारू नये.
एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलतीलउद्यापासून देशात एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होणार आहे. तेल कंपन्या दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या किंमतीचा आढावा घेतात.
राज्यानुसार एलपीजीच्या किमती बदलतात. म्हणजेच जर उद्या त्याची किंमत वाढली तर आपल्याला अधिक पैसे द्यावे लागतील. मेमध्ये 19 किलो आणि 14.2 किलो अनुदानित एलपीजी सिलिंडर्स दर स्वस्त झाले होते.
उद्यापासून धावणार 230 गाड्यालॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वे 1 जूनपासून 200 अतिरिक्त गाड्या चालवणार आहे, त्या एसी नसलेल्या असतील. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही ट्विटद्वारे याची माहिती दिली आहे. आधीपासून कार्यरत 30 गाड्यासुद्धा या 200 गाड्यांसह सुरू राहतील.
रेल्वेने चार महिन्यांपूर्वीच या गाड्यांसाठी अॅडव्हान्स तिकिटांची बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच तात्काळ कोट्यातून तिकिट बुकिंग सुरू झाले आहे.
रविवारी सकाळी आठ वाजता ही सुविधा सुरू झाली. रेल्वेने तिकिटांच्या आगाऊ बुकिंगच्या नियमात काही बदल केले आहेत. लॉकडाऊनमध्ये 30 दिवस अगोदरच तिकीट आरक्षणाची सुविधा होती. पण आता ते वाढवून 120 दिवस केले आहे.
रविवारी आधीच्या एक महिन्यापूर्वी अॅडव्हान्स बुकिंगचे नियम बदलले जातील. तसेच मधल्या स्थानकांवरून तिकिट बुकिंगची सेवा 31 मे रोजी सकाळी तिकीट काऊंटर व ऑनलाइन सेवेद्वारे सुरू करण्यात आली आहे.
जास्तीत जास्त 30 प्रवाशांना सामाजिक अंतराचे पालन करून बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या रोडवेज फक्त अशाच मार्गावर बस चालवितात जिथे उत्पन्न आहे आणि प्रवाशांची संख्या जास्त आहे. यासाठी 20 मार्ग निश्चित केले गेले आहेत. बस ऑपरेशन्सबरोबरच रोडवे सर्व प्रवाशांचा तपशीलही ठेवावा लागणार आहे.
Leave a comment