माजलगाव । वार्ताहर

‘वाट पाहीन पण एसटीनेचं जाईन’ ही लोकभावना सर्वसामान्य प्रवाशांमध्ये खोलवर रुजली होती. परंतु कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतचं चालला असून नागरिकांची चांगलीच दमकोंडी झाली. त्यात सर्व सामान्यांची एसटीबस कधी नव्हे दोन महिने एकाचं जागेवर थांबली ती कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ! त्यानंतर लॉकडाऊन चौथ्या टप्प्यात असतांना नॉन रेड झोनमध्ये जिल्हयाअंतर्गत बस सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली ! त्याची अंमलबजावणी ही 22 मे पासून झाल्याने माजलगाव आगाराच्या बस फेर्‍या सुरु करण्यात आल्या.परंतु अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून प्रवाशांनी बसकडे पाठ फिरवल्याने दोन दिवसापासून माजलगाव आगाराच्या एसटी बस फेर्‍या बंद करण्यात आल्या असल्याची माहिती ही आगार व्यवस्थापक दत्तात्रय काळम पाटील यांनी बोलतांना दिली. 

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी नागरिकांनी मिळेल त्या वाहनाने व काहींनी पायपीट करीत घर गाठण्याचा प्रयत्न केला पायपीट करणार्‍यांचा वाटेत तडफडून मृृत्यूू झाला !या घटनांत वाढ होत असल्याने सरकारने रेड झोन व नॉन रेड झोन हे दोन विभाग चौथ्या टप्प्यात केले. जे जिल्हे नॉन रेड झोनमध्ये आहेत अशा जिल्हयात अंतर्गत बससेवा सुरू करुन अडकलेल्या मजूर, यात्री,विद्यार्थी यांना राज्यात मोफत बसची सुविधा उपलब्ध करुन दिली.त्यासाठी अडकलेले प्रवाशांनी मेडिकल फिटनेस व थर्मल गनद्वारे तपासणी करुन परवानगी देण्यात आली.त्यानंतर मात्र जिल्हयातील नागरिक घराबाहेर पडले नाही.एका बसमध्ये 22 प्रवाशांना बसण्याची परवानगी असतांना 2 ते 3 प्रवाशी घेवून बस फेर्‍या करीत होती.परंतु खर्च हा जास्त आणि उत्पन्न कमी मिळत असल्यानं येथील माजलगाव आगाराच्या बस दोन दिवसापासून बंद करण्यात आल्या.बस आगाराला या लॉकडाऊनमुळे कोट्यवधींचा फटका बसला आहे.  

कमी उत्पन्नामुळे बस बंद 

माजलगाव आगाराच्या बस फेर्‍या 22 मे पासून सुरु केल्या होत्या.आठ दिवस बस बीड जिल्हयात अल्प प्रवासी घेवून धावली परंतु प्रवासी कमी खर्च जास्त व उत्पन्न कमी मिळत असल्याने दोन दिवसापासून आगाराच्या बस फेर्‍या बंद करण्यात आल्या आहेत अशी माहिती आगार व्यवस्थापक दत्तात्रय काळम पाटील यांनी दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.