शिरूर कासार । वार्ताहर
शिरूर तालुक्यात वाळू माफिया चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक करीत आहेत. निमगांव येथील सिंदफणा नदी पात्रात अवैध वाळु वाहतूक करणारा टॅ्रक्टर शनिवारी (दि.30) पहाटे तहसिलच्या पथकाने पकडला आहे.
पथकाने निमगांव मायंबा-फुलसांगवी रस्त्यावर सदर ट्रॅक्टर चालक पवार (रा.तरडगव्हाण) याला वाळू वाहतूकीच्या पावतीबाबत विचारणा केली. मात्र त्याच्याकडे पावती व परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले.ट्रॅक्टरमध्ये 1 ब्रास वाळू आढळून आली.नंतर पुढील कारवाईसाठी हा टॅ्रक्टर तलाठी बाबा बडे यांनी शिरुर पोलीसांच्या ताब्यात दिला आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी नियुक्त केलेल्या पथकातील तहसिलदार श्रीराम बेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार लक्ष्मण धस, मंडळाधिकारी सुरेश पाळवदे, तलाठी बाबा बडे, कोतवाल शरद बर्डे, शरद ठोबंरे, अमोल रणखांब, अतुल कातखडे, सुदाम कातखडे, अभिमन्यु गाडेकर यांनी केली.
Leave a comment