बीड । वार्ताहर
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षक हक्काचं वेतन अनुदान मिळत नाही यासाठी 1जून पासून सरकारच्या नाकर्ते पणा मुळे प्राणांतिक अन्नत्याग आंदोलन करत आहेत.राज्यातील 36 जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक स्वतःच्या घरीच अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.या आंदोलनाची निवेदने राज्यभर तहसीलदार,जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहेत.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शाळा कृती संघटनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आदींना निवेदने देण्यात आली आहेत. राज्यातील विनाअनुदानित शिक्षक राज्य शासनाच्या अनागोंदी कारभाराला पुरते कंटाळले असून अन्नत्यागासारखे आंदोलन करीत असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा दीपक कुलकर्णी,राज्य कार्याध्यक्ष प्रा संतोष वाघ, राज्य सचिव प्रा. अनिल परदेशी, राज्य उपाध्यक्ष प्रा. राहुल कांबळे यांनी सांगितले. गेली 20 वर्षे अनुदान आज ना उद्या मिळेल या आशेवर हलाखीचे जीवन जगणार्या शिक्षकांचे हाल झाले आहेत. कोरोना महामारीच्या काळात राज्यातील विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक उपासमारी मुळे व्हेंटिलेटर वर आहेत.अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर असलेल्या अनुदान वाटपाचा शासन निर्णय तातडीने निघाल्यास हेच शिक्षक मोकळा श्वास घेऊ शकतील आशा भावना राज्यउपाध्यक्ष प्रा.राहुल कांबळे यांनी व्यक्त केल्या आहेत.
Leave a comment