बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यातून शनिवारी पाठवलेल्या 38 स्वॅबपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाची लागण झालेला रुग्ण पाटोदा तालुक्यातील डोमरी येथील आहे. बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी डोमरी गाव कंटेन्मेंट झोन घोषित केले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार पाटोदा तालुक्यातील डोमरी हे गांव आता पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान शनिवारी बीड जिल्ह्यातून तपासणीला पाठवलेले 37 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत , तर 10 दिवस उपचार घेऊन कोरोनाशी लढा देणारे एकूण 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Leave a comment