कोरोना लढाईत मास्क विक्रीत झाली
19 लाखांची विक्रमी उलाढाल
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातील महिला स्वंयसहायता गटांनी कोरोना लढाईत सक्रिय सहभाग नोंदवून आतापर्यत 1 लाख 48 हजार 990 मास्कची निर्मिती केली आहे. सदर मास्क अत्यंत वाजवी दरामध्ये विक्री केले. त्याद्वारे 19 लाख 19 हजार 207 रुपयांची विक्रमी उलाढाल केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील गरिब कुटुंबाना माफक दरामध्ये मास्क उपलब्ध झाले असून लॉकडाऊन सारख्या परिस्थितीमध्ये देखील स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे अशी माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.
ग्राम विकास विभागामार्फत उमेद या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या उपक्रमाच्या माध्यमातून गरिब, वंचित, विधवा,अपंग, एकल,अति गरीब अशा कुटुंबातील महिला एकतर येऊन स्वयंसहायता गट स्थापन केला जातो. आजमित्तीस उमेद अभियानाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात जवळपास दोन लक्ष कुटुंब अभियानाशी जोडली गेली आहेत. सध्या कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्ाव नोठ्या प्रमाणावर होत असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रत्येक व्यक्तीने वैयक्तिक काळजी घेणे अत्यावश्यक असुन स्वत:ला व इतरांना संसर्ग होऊ नये याकरिता तोंडाला मास्क वापरणे गरजेचे झाले आहे. अशावेळी बीड जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता गटांनी चांगले काम केले आहे.
आता सामाजिक संस्था, ग्रामपंचायत आणि शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा स्वयंसहायता गटाने उत्पादित केलेले मास्क वापण्यास सुरुवात झाल्याने अनेक कुटुंंबांना मोठा आर्थिक हातभार लागण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर मास्क विक्रीतून कोरोना विरुध्दच्या लढाईत मोलाची भूमिका बजावत असल्याच्या सामाजिक भावनेतून ग्रामिण महिलांचा आत्मविश्वास देखील वाढीस लागलेला आहे. भविष्यात केविड-19 या विषाणू विरुद्धच्या प्रतिवंधात्मक उपाययोजनांसाठी दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर मास्कची आवश्यकता असून यामध्ये बीड जिल्ह्यातील स्वंय सहाय्यता गटांमार्फत जिल्ह्यातील तसेच राज्यातील नागरिकांना वाजवी किमंतीत मास्क उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर नियोजन करण्यात आले असून तशा सूचनाही यंत्रणेला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
Leave a comment