केज तालुक्यातील विद्यार्थीनीची फसवणूक
केज । वार्ताहर
फोन पे वॉलेट अँपद्वारे एका खाते नंबरवर दोन हजार रु. ट्रांजेक्शन केल्यास तुम्हाला परत दोन हजार रु. बक्षीस म्हणून मिळतील. असे सांगून एका विद्यार्थीनीला तब्बल त्र्याहत्तर हजार रु. ला गंडा घातला आहे.
तालुक्यातील शेलगाव येथील कोमल सतीश जाधव या विद्यार्थिनींचे केज येथील आयडीबीआय बँक शाखेत बचत खाते आहे. तिला दि.30 मे रोजी दुपारी 7074573851 या नंबरवरून एक अज्ञात व्यक्तीचा फोन आला. ‘तुम्ही 7074573851 या नंबरवर फोन-पे- वॉलेट अॅपच्या माध्यमातून दोन हजार रु. चे ट्रांजेक्शन करा. त्या बदल्यात तुम्हाला तुम्ही जेवढे पैसे ट्रांजेक्शन केले त्याच्या दुप्पट पैसे तुमच्या खात्यात जमा होतील’ असे अमिश दाखविले. त्यानुसार कोमलने एकूण 29 वेळा पैसे ट्रांजेक्शन केले. त्यातील 23 वेळा प्रत्येकी दोन हजार रु.तर एक वेळा तीन हजार, एकावेळी चार रु. आणि एका वेळी दहा हजार रु. असे एकूण त्र्याहत्तर हजार रु ट्रांजेक्शन केले आहेत. मात्र नतंर तिने आपल्या खात्यावर बक्षिसाची पैसे जमा झाले किंवा नाही याची खातरजमा केली असता बक्षीस ऐवजी आपल्या खात्यावरील पैसे कमी झाले असून आपण फसलो गेलो आहोत हे लक्षात येताच बँकेला आणि पोलिसात तक्रार केली आहे. मात्र तोपर्यंत त्या अनोळखी इसमाने तो फोन नंबर बंद केला.सदरील मोबाईल नंबर हा राज्याबाहेर असल्याचे समजते.
नागरिकांनी सतर्क रहावे-पो.नि.त्रिभुवन
कोणी अमिश दाखवून एटीएमचा नंबर, ओटीपी कोड, पिन नंबरची किंवा खात्या विषयी माहिती घेत असेल तर नागरिकांनी अशी माहीती देऊ नये. यातून फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पो.नि.प्रदिप त्रिभुवन यांनी केले आहे.
Leave a comment