महिला व बालविकास विभागाचा अजब कारभार
केज । वार्ताहर
महिला व बालविकास विभागाचा अजब कारभार पहायला मिळत असून पोषण आहाराच्या पॅकेटवर नाव एक आणि आत वेगळेच असा प्रकार पुढे येत आहे.
केज तालुक्यात अंगणवाडीमध्ये बालक व गरोदर माता यांना देण्यात येत असलेल्या बंद पाकिटातील पोषण आहारात मसूर डाळ असे पाकिटावर लिहिले असले तरी पाकिट फोडताच आत मध्ये चक्क हरबरा निघाले आहेत. या बाबत सामजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात हे तक्रार करणार असून या प्रकारच्या फसवणुकीची आणि संबंधित पुरवठादार एजन्सीजची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.दरम्यान लॉकडाउन असल्यामुळे हरभरे पॅकिंग करण्यासाठी बॅग उलब्ध नसल्याने मसूर डाळ नावाच्या पाकिट वापरले आहेत असे महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती लटपटे यांनी म्हटले आहे. तर सामाजिक कार्यकर्ते, चंदक्रात खरात यांनी म्हटले आहे की, ही बालक व मातांची फसवणूक आहे. याबाबत कठोर कार्यवाही व्हायला हवी. आणि महिला व बालविकास विभाग याला जबाबदार आहे.
Leave a comment