शेतकर्यांचे आर्थिक गणित बिघडणार
आष्टी । रघुनाथ कर्डीले
तीन महिन्यापासून सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्या लोक डाऊन मुळे शेतकरीवर्ग अगोदरच परेशान झाला असताना आता पावसाळ्याचे दिवस तोंड आलेले आहेत.यामध्ये खरीप हंगामाच्या पेरणीसाठी लागणार्या बी-बियाणांची जमवाजमव शेतकरीवर्ग करत असतानाच बीबियाणाच्याया किंमती भरमसाठ वाढल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. गेल्या तीन महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने शेतकर्यांचा शेतीमाल कवडीमोल भावाने विकला गेल्यामुळे या हंगामात पेरणी कशी करायची या विवंचनेत शेतकरी वर्ग सापडला आहे. प्रमुख्याने सोयाबीन मूग, तूर ,कांदा व उडीद या बियाण्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत
मागच्या वर्षी शेतकर्यांना सोयाबीन 1650 रुपयाला 30किलोची बॅग मिळत होती ती आता 2250 रुपयांवर गेली आहे.एक किलो कांदा बी गत वर्षी 1500 रुपयांला होती आता 2200 रुपयांवर गेली आहे.उडीद,मूग,तूर या बियाणांच्या किमतीतही 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे.जास्तीची भाव वाढ केल्याने शेतकर्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.कोरोनाच्या या महासंकट काळामध्ये शेतकर्यांना आवश्यक तेवढ्या खते व बियाण्यांची उपलब्धता करून देणे हे सरकारचं कर्तव्य असताना पेरणीच्या ऐन तोंडावरच बियाण्यांची झालेली ही दरवाढ शेतकर्यांना आर्थिक संकटात लोटणारी आहे. उत्पादन खर्च वाढल्याने बियाण्यांची भाववाढ झाली असली तरी त्यावर सरकारने उपाय सुचवणं गरजेचं आहे. आष्टी तालुक्यामध्ये कांदा या पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होत असून गेल्या पाच ते सात वर्षांपासून आष्टी तालुक्यातील कांदा परदेशातही जात आहे यामध्ये श्रीलंका इंडोनेशिया दुबई इत्यादी देशांमध्ये गत काही वर्षांमध्ये आष्टी तालुक्यातील कांदा परदेशात गेला आहे. तालुक्यांमध्ये कांदा लागवड करणारा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर असून यावर्षी चक्क कांद्याच्या बियाणांमध्ये एक किलोला सातशे रुपयांची वाढ झाल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित मात्र यामध्ये कोलमडणार आहे.
Leave a comment