मराठा मताच्या विभागणी साठी आडसकर यांची उमेदवारी -होके
माजलगाव : प्रतिनिधी
2014 ते 19 या काळात उपरा उमेदवार आमदार केल्यामुळे माजलगाव मतदारसंघतील जनतेने खूप काही भोगलं आहे. शहरातील बीड रोड रस्त्याची जी अवस्था झाली आहे ती केवळ स्थानिक चा आमदार नसल्यामुळे झाली आहे या सर्व गोष्टीचा विचार करून यंदा पून्हा केज चेपार्सल केजला पाठवा महाविकास आघाडीचे उमेदवार मोहनराव जगताप यांना विजयी करा असे आवाहन मराठा समन्व्यक राजेंद्र होके यांनी केले.
आ प्रकाश सोळंके यांनी निष्पाप मराठा तरुणावर गुन्हे दाखल केले असून त्यांना घरी बसवा, मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्याविषयीं सुंदर भोसले सोबत बोलताना वापरलेले अपशब्द लक्षात ठेवा, आंतरवली येथे महिलावर गोळीबार लक्षात ठेवा यासाठी नवीन व तरुण उमद्या उमेदवार मोहनराव जगताप यांना निवडून द्या. येणारी सत्ता ही महाविकास आघाडीची आहे या सत्तेत आपला माणूस आमदार असला पाहिजे. अपक्ष उमेदवार आडसकर हे केवळ मराठा मताची विभागणी करण्यासाठी उभे आहेत म्हणुन आपले मतदान मोहन जगताप यांनाच करा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मराठा आंदोलक राजेंद्र होके यांनी केले.
Leave a comment